सुमित सोनवणे, प्रतिनिधीदौंड, 17 जानेवारी : सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गाडीला चारचाकी गाडीने पाठीमागून धक्का दिला. त्यानंतर झालेल्या वादात महेश मांजरेकर यांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप एका व्यक्तीने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता पुणे-सोलापूर महामार्गावर घडली आहे. महेश मांजेरकर यांच्या गाडीला पाठीमागून मारुती सुझुकी ब्रिझ्झा या गाडीने धडक दिली होती.
आपल्या गाडीला धडक दिली. त्यामुळे मांजरेकर हे बाहेर येऊन पाहणी करत होते. त्यावेळी झालेल्या वादात मांजरेकर यांनी आपल्याला शिवीगाळ करुन चापट मारली अशी तक्रार कैलास सातपुते नावाच्या व्यक्तीने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असणाऱ्या यवत पोलिसांकडे दिली आहे.
शॅडो बँकांमधील गैरव्यवहारांचे प्रमाण वाढत असल्यानं रिझर्व्ह बँकेने उचललं पाऊल
या तक्रारीवरून महेश मांजरेकर यांनी उजव्या गालावर चापट मारली व शिवीगाळ दमदाटी केली म्हणून त्यांच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे भा.द.वि 323 504 506 अन्वये अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा(NC) दाखल करण्यात आला आहे. तसंच, मांजरेकर यांनी दारू पिऊन चापट मारली, असं तक्रारदाराने त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील तक्रादार व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यंदा चलो नेपाळ! या साठीतल्या तीन आज्या रोड ट्रीपमधून पालथं घालतात जग...
आपल्या पुढे असलेल्या महेश मांजरेकर यांनी त्यांच्या कारला अचानक ब्रेक लावल्याने आपली कार त्यांच्या कारला पाठी मागून धडकली. त्यानंतर गाडीतून उतरुन महेश मांजरेकर यांनी 'तू दारू पिउन गाडी चालवतोस का' असं म्हणत आपल्याला चापट मारली, असं तक्रारदाराने तक्रारीत यवत पोलिसांना सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.