वीज चोरी पकडली म्हणून इंजिनीयरला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

वीज चोरी पकडली म्हणून इंजिनीयरला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

येवला तालुक्यात देवरगाव येथे वीज चोरी पकडली म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंते सुरेश जाधव यांना मारहाण करीत अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

  • Share this:

बब्बू शेख,मनमाड, ता. 4 सप्टेंबर : येवला तालुक्यात देवरगाव येथे वीज चोरी पकडली म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंते सुरेश जाधव यांना मारहाण करीत अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. जाधव यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनं खळबळ उडाली आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. देवरगाव इथं वीज चोरी मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती जाधव यांना मिळाली होती. त्यानंतर जाधव यांच्यासह तीन महिला कर्मचाऱ्यांचं पथक देवरगावला आलं आणि त्यांनी पाहणी सुरू केली.

त्यावेळी एका घरात अवैध वीज घेत असल्याचं त्यांना आढळून आलं. तेव्हा त्यांनी वीज तोडून चौकशी सुरू केली असता घरमालकाने सुरूवातीला जाधव यांना मारहाण केली आणि नंतर रॉकेल त्यांच्या अंगावर टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

जाधव यांच्यासोबत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवून जाधव यांना सुरक्षित बाहेर काढलं आणि पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत आरोपीने तिथून पळ काढला. जाधव यांच्या अंगावर रॉकेल पडल्याने त्यांना येवल्यातल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत.

या आधाही 2011मध्ये मनमाड जवळ अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना पेट्रोलची चोरी पकडली म्हणून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2018 03:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading