• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा, अध्यक्षपदी चंद्रकांत ठाकरे बिनविरोध

वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा, अध्यक्षपदी चंद्रकांत ठाकरे बिनविरोध

मागील महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढल्याने व काँग्रेस, शिवसेना, महाविकास आघाडीत वंचित व जनविकासचीही घडी बसली. त्यामुळे भाजपनेही माघार घेतली.

मागील महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढल्याने व काँग्रेस, शिवसेना, महाविकास आघाडीत वंचित व जनविकासचीही घडी बसली. त्यामुळे भाजपनेही माघार घेतली.

मागील महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढल्याने व काँग्रेस, शिवसेना, महाविकास आघाडीत वंचित व जनविकासचीही घडी बसली. त्यामुळे भाजपनेही माघार घेतली.

 • Share this:
  किशोर गोमासे, प्रतिनिधी वाशिम, 19 नोव्हेंबर : ओबीसी आरक्षणावरून (OBC reservation) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडत आहे. वाशिममध्ये (Washim Zilla Parishad elections) महाविकास आघाडीच्या  (mva government) उमेदवार चंद्रकांत ठाकरे (chandrakant thackery) यांनी बाजी मारली आहे. चंद्रकांत ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कोणत्याही पक्षाने अर्ज न सादर केल्यामुळे ठाकरेंची सहज निवड झाली. मागील महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढल्याने व काँग्रेस, शिवसेना, महाविकास आघाडीत वंचित व जनविकासचीही घडी बसली. त्यामुळे भाजपनेही माघार घेतली. वाशिम जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 52 आहे. पोट निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस 14, काँग्रेस 11, जनविकास 6, वंचित बहुजन आघाडीचे 6, शिवसेना 6, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1,तर अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल झाले आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी एकमेव चंद्रकांत ठाकरे यांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. ..आणि प्रिया बापटने नवऱ्यालाही नाचवलं; जोडप्याच्या Videoला तुफान पसंती वाशीम जिल्ह्यात राबविल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, काँग्रेसचे 11, शिवसेनेचे 6 सदस्य असे 31 सदस्य एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे सत्तेचे समीकरण जुळणे सोपे होते. त्यातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी महाविकास आघाडीचीच भूमिका घेतल्याने चंद्रकांत ठाकरे यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीनंतर चार विषय समितीच्या सभापती पदांपैकी रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रमाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. 20 वर्षांपासून क्रिकेट खेळतोय, पण लहान मुलासारखा आऊट झाला शोएब मलिक, VIDEO दरम्यान, सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू असून महत्त्वाच्या पदासाठी चढाओढ लागली आहे. त्यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारिप-बमसंची युती झाल्याने सदर निवडणूक बिनविरोध झाली होती. हाच फॉर्म्युला आता विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीतही कायम राहणार असल्याचं समजते. या सर्वांना एकत्र आणून महाविकास आघाडीसोबत जनविकास आघाडी व वंचितनेही उडी मारली. त्यामुळे हे चित्र अधिकच स्पष्ट झाले होते. ऐन निवडणुकीच्या वेळेवर अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षाने अर्ज न भरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
  Published by:sachin Salve
  First published: