मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पावसाळी अधिवेशनाआधी महाविकासआघाडीत खडाजंगी, विरोधी पक्षांच्या बैठकीत काँग्रेस नाराज

पावसाळी अधिवेशनाआधी महाविकासआघाडीत खडाजंगी, विरोधी पक्षांच्या बैठकीत काँग्रेस नाराज

उद्यापासून राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) मुंबईमध्ये सुरू होत आहे. या अधिवेशनाआधी रणनिती ठरवण्यासाठी महाविकासआघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची बैठक झाली, पण या बैठकीत काँग्रेसने (Congress) विरोधी पक्षनेतेपदावरून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 16 ऑगस्ट : उद्यापासून राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) मुंबईमध्ये सुरू होत आहे. या अधिवेशनाआधी रणनिती ठरवण्यासाठी महाविकासआघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची बैठक झाली, पण या बैठकीत काँग्रेसने (Congress) विरोधी पक्षनेतेपदावरून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. शिवसेनेकडून विधानपरिषदेत अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसने मात्र हे पद आपल्याला मिळावं, अशी मागणी केली होती. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला (NCP) तर विधानपरिषदेत उपसभापतीपद शिवसेनेकडे (Shivsena) आहे, त्यामुळे विधानपरिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावं, यासाठी काँग्रेस आग्रही होती. विधानपरिषदेमध्ये शिवसेनेचे 12, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी 10-10 आमदार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपण विधान परिषदेचं सदस्यत्वही सोडत असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांना दिला, पण आमदारकीच्या राजीनाम्याचं पत्र विधान परिषद उपसभापतींना दिलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. विधान परिषदेत शिवसेना सदस्यांचा आकडा जास्त असावा, यासाठी उद्धव ठाकरेंनी आमदारकी सोडली नाही का? अशा चर्चाही झाल्या. अधिवेशनाआधी झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत दिलीप वळसे पाटील, कपिल पाटील, हसन मुश्रीफ, सचिन अहिर, सुनिल शिंदे, अनिल परब, मनिषा कायंदे, रईस शेख, नाना पटोले, वजाहत मिर्झा, बाळाराम पाटील हे नेते उपस्थित होते. विरोधी पक्षांची बैठक झाल्यानंतर या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या गटातील एकाही आमदाराला समितीमध्ये न घेतल्यामुळे ही भेट घेण्यात आली. ठाकरे गटातल्या आमदाराला समितीमध्ये घ्यावं, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
First published:

Tags: NCP, Shivsena

पुढील बातम्या