मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यपाल vs सरकार संघर्ष: महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांच्या भेटीस, करणार 'ही' विनंती

राज्यपाल vs सरकार संघर्ष: महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांच्या भेटीस, करणार 'ही' विनंती

महाविकास आघाडीचे नेते (Mahavikas Aghadi leader) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहे.

मुंबई, 26 डिसेंबर: महाविकास आघाडीचे नेते (Mahavikas Aghadi leader) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेतील. मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), एकनाथ शिंदे(Eknath Shinde), छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) राज्यपालांकडे जाणार असल्याची माहिती मिळतेय. विधानपरिषदेचे 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्या, राज्यपालांकडून महाविकास आघाडीच्या कामात हस्तक्षेप, हिंगोली, नांदेड, परभणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेल्या बैठका, ओबीसी अध्यादेश वेळी राज्यपालांकडून विचारणा, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू नेमताना आता अधिकारांची कपात असे अनेक विषय राज्यपाल विरुद्ध सरकार दिसून आले. हेही वाचा-  'ही मुलं माझी नाही' म्हणत अपंग बापाने 13 वर्षांच्या मुलाचा केला खून, मृतदेह फेकला नदीपात्रात! विधानसभेच्या अधिवेशनात विधासनभा अध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीने घेण्यात यावी, असा नियमात बदल करण्यात आला. लोकसभा आणि राज्यसभेत अध्यक्ष किंवा उपसभापती यांची निवड अवाजी मतदानानेच केली जाते. विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरविण्याचा अधिकार सरकारचा, मात्र त्याला राज्यपालांची मान्यता आवश्यक त्यामुळे हा संघर्ष वाढणार आहे. महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांना विनंती करणार आहेत.
First published:

Tags: Governor bhagat singh

पुढील बातम्या