मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाविकास आघाडीतून काँग्रेस पडणार बाहेर? नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य

महाविकास आघाडीतून काँग्रेस पडणार बाहेर? नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य

'पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो.

'पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो.

'पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो.

    औरंगाबाद, 11 ऑगस्ट : महाविकास आघाडी सरकार (mva government) सत्तेवरून पायउतार झाल्यामुळे आता तिन्ही पक्षांमध्ये फूट पडण्याची चिन्ह आहे. 'महाविकास आघाडी नैसर्गिक युती नाही, ना कोणतीही पर्मनंट आघाडी नाही. विपरीत परिस्थिती एकत्र आलेले पक्ष आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चिन्ह आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये नाना पटोले यांनी हजेरी लावली. यावेळी बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली तसंच महाविकास आघाडीच्या भविष्यावरही भाष्य केलं. 'पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो. आमची आघाडी विपरीत परिस्थिती मध्ये झाली होती. आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य आहे. आमची काही नैसर्गिक युती नाही, चर्चा करून निर्णय घ्यायला हवा आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. पण हे साधं बोलायला विचारायला तयार नाही, अशी टीकाही पटोलेंनी सेनेवर केली. ('एक आमदार की किमत...'; बस बाई बसच्या मंचावर पंकजा मुंडेचा अनोखा अंदाज) विधान सभेत राष्ट्रवादी विरोधीनपक्ष नेते झाले, विधान परिषद नेतेपद आम्हाला हवे होते बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला, असं म्हणत पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. 'शेतकऱ्याला चांगली मदत द्यायला हवी हे सरकार लॉलीपॉप देतंय. येणाऱ्या निवडणूक महाविकास आघाडीने लढावे की नाही, या बाबत निर्णय कार्यकर्ते घेतील, आम्ही दोस्ती करतो पाठीवर वार नाही. आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो, तुम्ही आमच्याकडे आला होता हे लक्षात ठेवावे, असा टोलाही पटोलेंनी लगावला. (दबंगगिरी वाढली, पोलिसही हतबल; 6 महिन्यात 31 सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले, VIDEO) 'देशाच्या लोकशाहीला संपवण्याचे जे काम सुरू आहे. त्यासाठी आमची ही यात्रा आहे. गुजराती नेत्यांसाठी हे सरकार आहे. मलाईदर खात्यासाठी शिंदे सरकारमध्ये रस्सीखेच सुरू आहे. हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, हे ब्लॅकमेल सरकार आहे, अशी टीका पटोलेंनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या