मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात ठेवले? पंकजा मुंडेंचा काँग्रेस मंत्र्यावर पलटवार, म्हणाल्या...

सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात ठेवले? पंकजा मुंडेंचा काँग्रेस मंत्र्यावर पलटवार, म्हणाल्या...

' जो कर्मावर विश्वास ठेवतो ते या गोष्टी करत नाहीत. सत्ता जाणार नाही हे म्हणतात आणि...'

' जो कर्मावर विश्वास ठेवतो ते या गोष्टी करत नाहीत. सत्ता जाणार नाही हे म्हणतात आणि...'

' जो कर्मावर विश्वास ठेवतो ते या गोष्टी करत नाहीत. सत्ता जाणार नाही हे म्हणतात आणि...'

बीड, 26 सप्टेंबर : महाविकास आघाडी सरकार (mva government) आज पडणार, उद्या पडणार अशी विधानं वारंवार केली जात आहे. पण, 'सरकार पडावे म्हणून आम्ही काही देव पाण्यात ठेवले नाही. सध्या पाण्यात तर शेती आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.  देव पाण्यात घालून बसण्याची आवश्यकता नाही' असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांना प्रत्युत्तर दिले.

पंकजा मुंडे यांनी आज दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी भगवानगडाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

'सरकार पडावे म्हणून आम्ही काही देव पाण्यात ठेवले नाही. सध्या पाण्यात तर शेती आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.  देव पाण्यात घालून बसण्याची आवश्यकता नाही. जो कर्मावर विश्वास ठेवतो ते या गोष्टी करत नाहीत. सत्ता जाणार नाही हे म्हणतात आणि सत्ता जाणार हे सुद्धा हेच म्हणतात. पण यात लोक दुर्लक्षित होऊ नये. त्यामुळे जे ते आपल्या भूमिकेत कायम राहिले तर लोकांचं भलं होईल, असं टोला पंकजा यांनी विजय वडेट्टीवार यांना लगावला.

कॉपी करण्यासाठी तयार केली ब्लूटूथ चप्पल; तंत्रज्ञानाचा असा वापर पाहून हैराण व्हा

तसंच, उद्या जयंत पाटील परळीत आहेत. मी बीडच्या एसपींना विचारणार आहे. आम्ही दर्शनाला गेलो तर गुन्हे दाखल झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वाढदिवस भव्यता दाखवून साजरे करण्यात आले.  केक कापले गेले.  लोकांना उपचारला इथं पैसे नाही आणि इथं भव्यता दाखविली जात आहे, असं म्हणत पंकजा यांनी  धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

'भगवान बाबा यांच्या जन्म गावी यंदाचा दसरा मेळावा होणार आहे. त्याचीच पाहणी करण्यासाठी मी आज सावरगाव येथे गेले होते. संपूर्ण परिसराचा आढावा घेतला. कोरोनामुळे गतवर्षी मला ऑनलाईन दसरा मेळावा घ्यावा लागला होता. त्यावेळी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल  केला होता.  मंदिर खुले होतील अशी मी आता गुड न्यूज ऐकली आहे.  मात्र सरकारचे नियम बदलतील का हे आम्ही पाहतोय. तरीही मी दर्शनाला जाणार आहे. दर्शनाला जाण्यासाठी कुठलीही बंदी नाही.  भगवान बाबा आणि मेळाव्याला जोडले गेले सर्व भक्त आणि भाविक दर्शनासाठी येतील, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

गुडघ्यातून वाहत होतं रक्त, तरीही CSK च्या प्लेअरचा सीमारेषेवर अफलातून झेल

'स्त्रियांचं सबलीकरण आणि प्रश्न सोडविण्यासाठी दोन दिवसीय अधिवेशन बोलावले पाहिजे. राज्यपालांनी तसे पात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे' असंही पंकजा म्हणाल्या.

संजय राऊत यांनी काय म्हटलं हे मी ऐकलं नाही. परंतु मोदीजी हे स्वत:ला प्रधान सेवक म्हणवतात. ते कुठे राहतात हे कधीच अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना जो सन्मान मिळाला त्यापेक्षा परमोच्च सन्मान मोदीजींनी मिळवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात की, हे मोदीजी भारताचे पंतप्रधान आहेत म्हणून सन्मान. उद्धव ठाकरे दिल्लीत कोणत्या कारणासाठी भेटले हा त्यांचा विषय आहे' असंही पंकजा म्हणाल्या.

'महिला अत्याचार वाढला आहे याचा तीव्र संताप व्यक्त करते आहे.  सोनपेठमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. बीड जिल्ह्यात एक माफिया तयार झाला आहे. पोलिसांचा धाक राहिला नाही. प्रशासन दावणीला बांधलेले असल्यास खोटे केसेस दाखल होतात.  ऍट्रॉसिटी कायदा एका विशिष्ट वर्गाच्या सुरक्षेसाठी आहे, मात्र त्याचा दुरुपयोग होतोय, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी करुणा शर्मा यांचं नाव न घेता  खंत व्यक्त केली.

First published:

Tags: पंकजा मुंडे, बीड