• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुधात साखर, आदित्य ठाकरेंनी केली थोरातांची स्तुती

महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुधात साखर, आदित्य ठाकरेंनी केली थोरातांची स्तुती

'गेल्या दीड-दोन वर्षापासून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करत असून वातावरण विश्वासचं असलं पाहिजे आणि शिवसेना...'

'गेल्या दीड-दोन वर्षापासून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करत असून वातावरण विश्वासचं असलं पाहिजे आणि शिवसेना...'

'गेल्या दीड-दोन वर्षापासून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करत असून वातावरण विश्वासचं असलं पाहिजे आणि शिवसेना...'

  • Share this:
संगमनेर, 31 ऑक्टोबर : 'गेल्या दीड-दोन वर्षापासून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करत असून वातावरण विश्वासाचं असलं पाहिजे आणि शिवसेना आपल्या पोटात कधीच काही ठेवत नाही आणि महाविकास आघाडी होण्यापूर्वीपासून आमच्या सर्वांच्या ओळखी होत्याचं' असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांनी केलं. गेल्या 16 वर्षांपासून संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यात वृक्षारोपण करत दंडकारण्य अभियान राबविले जात असून आज यावर्षीच्या दंडकारण्य अभियानाचा सांगता सोहळा पार पडला. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) व राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते.  विशेष म्हणजे, यावर्षी महाविकास आघाडी स्थापन झाल्याने दंडकारण्य सोहळ्याला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 'महाविकास आघाडी म्हणजे आमचे साखरे एवढे गोड संबंध आहेत. आता साखरेत ही अनेक प्रकार आले आहे. कोणी साखर घेतं, कोणी गूळ घेतो मात्र सगळं थोडं थोडं घ्यायच असतं आणि थोरात यांच्या दुधसंघात गेल्यावर मला कळलं की महाविकास आघाडी म्हणजे दुधात जशी साखर मिसळते तसे एक झालो आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. कोरोनामुळे आर्थिक अडचणी असताना विकासाकडे आम्ही लक्ष देत आहोत मात्र काही मंडळी रोज देव पाण्यात बुडवून बसली आहे. तर काही जण स्वप्न पाहताय तर काही जण स्वप्नात बडबडतही असतील, असा टोला विरोधकांना लगावताना पुढील 3 वर्ष सुद्धा एकत्र पद्धतीने महाविकास आघाडी काम करेल, असा विश्वास महसूलमंत्री थोरात यांनी व्यक्त केला. तर यावेळी सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अनेक गुपित उघड करत 2014 ला बाळासाहेब थोरात यांनी मला निवडणुकीत मदत केल्याचा गौप्यस्फोट भाषणातून केला. तर 2019 ला विखेंच्या मदतीने खासदार झाल्याने आज आई जेवू देईना आणि बाप भीक मागू द्यायना अशी माझी अवस्था झाली आहे, असं वक्तव्य केल्यानंतर सभेत एकच हश्या पिकली झाला.
Published by:sachin Salve
First published: