शरद पवारांचा वाढदिवस ठरणार 'ठाकरे सरकार'च्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त?

शरद पवारांचा वाढदिवस ठरणार 'ठाकरे सरकार'च्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त?

शिवसेना भाजपपासून दूर गेल्यानंतर शरद पवार यांना आपली रणनीती बदलली.

  • Share this:

मुंबई, 7 डिसेंबर : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय नाट्य घडलं. या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रस्थानी होते. 'आम्हाल विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच नाही,' अशी भूमिका सुरुवातीच्या काळात शरद पवार यांनी घेतली. मात्र नंतर शिवसेना भाजपपासून दूर गेल्यानंतर शरद पवार यांना आपली रणनीती बदलली.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका घेतली. मात्र अजित पवार यांनी अचानक बंड करून सर्वांनाच धक्का दिला. अजित पवार यांच्या बंडाला शरद पवार यांचीही सहमती आहे का, अशीही चर्चा राज्यभर सुरू झाली. मात्र नंतर शरद पवार हे अत्यंत आक्रमकपणे या लढाईत उतरले. त्यांनी काही तासांतच अजित पवार यांचं बंड मोडून काढलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला.

शरद पवार यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळेच महाविकास आघाडीचे सरकार आकार घेऊ शकले. त्यामुळे आता सरकार चालवताना आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांत समन्वय ठेवताना शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र अजूनही याबाबतचा तिढा सुटलेला नाही. आता मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख समोर आली आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसाला म्हणजेच 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या गोटात रंगू लागली आहे. त्यामुळे खरंच 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होतो का, हे पाहावं लागेल. तसंच या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळते, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 7, 2019, 1:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading