रस्ते अपघातात महाराष्ट्राचा क्रमांक देशात तिसरा !

रस्ते अपघातात महाराष्ट्राचा क्रमांक देशात तिसरा !

महाराष्ट्र हे देशातलं सर्वात विकसित राज्य असलं तरी महाराष्ट्रातल्या रस्त्यांची अवस्था मात्र फारशी समाधानकारक नाही. कारण देशात सर्वात जास्त रस्ते अपघात होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे.

  • Share this:

मुंबई, 6 सप्टेंबर : महाराष्ट्र हे देशातलं सर्वात विकसित राज्य असलं तरी महाराष्ट्रातल्या रस्त्यांची अवस्था मात्र फारशी समाधानकारक नाही. कारण देशात सर्वात जास्त रस्ते अपघात होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे. देशात गेल्या वर्षभरात जवळपास 2 हजार 324 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वार्षिक अहवालातच ही गंभीर बाब समोर आलीय.

रस्ते अपघातातले बहुतांश बळी हे खराब रस्त्यांमुळे झाल्याचं सांगण्यात येतंय. महाराष्ट्रात होणाऱ्या रस्ते अपघातांची संख्या नक्कीच भूषणावह नाही. नितीन गडकरींकडं केंद्रीय परिवहन मंत्रालय आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात अनेक रस्ते बांधले जातील शिवाय वाहतुकीचे नियम अधिक कठोर केले जातील अशी अपेक्षा आहे.

रस्ते अपघातांमधील साधनसंपत्ती व जिवितहानी कमी करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने २0२0 सालापर्यंत विकसनशील देशांमध्ये एकूण अपघात संख्या ५0 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग व महाराष्ट्र परिवहन विभाग यांच्या संयुक्तपणे प्रयत्न करत असून काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2017 09:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading