सरकार स्थापनेबाबत आज घोषणा? 'या' आहेत आजच्या 5 ठळक घडामोडी

सरकार स्थापनेबाबत आज घोषणा? 'या' आहेत आजच्या 5 ठळक घडामोडी

सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं पुढचे 24 तास महत्त्वाचे असणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर: सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं पुढचे 24 तास महत्त्वाचे असणार आहेत. सत्ता स्थापनेबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली असून आज चित्र स्पष्ट होईल असा दावा आघाडी आणि सेनेच्या आमदारांकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील आजच्या काय घडामोडी ठळक घडामोडी असणार आहेत त्याचा थोडक्यात आढावा.

1. राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी रात्री उशीरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते बैठकीला उपस्थित होते. सुमारे सव्वा तास ही बैठक सुरु होती. सत्ता स्थापनेसाठी येत्या दोन दिवसांत दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

2. आज उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांशी संवाद साधणार आहेत. 'मातोश्री'वर सकाळी 10 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत शिवसेनेची सत्ता स्थापनेची अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.  सर्व आमदारांना आधारकार्ड, कागदपत्रं आणि 5 दिवसांचे कपडे घेऊन बोलण्यात आलं. तसंच आमदारांच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला असल्यानं त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर सर्व आमदारांसोबत उद्धव ठाकरे थेट संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा केंद्राचा डाव, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

3. शिवसेना नेते संजय राऊत आज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्ता स्थापनेसंदर्भात राऊतांची पत्रकार परिषद महत्त्वाची ठरणार आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात राऊत शिवसेनेची काय भूमिका मांडतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे.

4. महाविकासआघाडीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत अजून काहीही ठरलेलं नाही. असं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. काँग्रेसच्या अटीनंतर महाशिवआघाडीचं नाव आता महाविकासआघाडी करण्यात आलंय. सत्तेचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

5. मुंबई महापालिकेत महापौर-उपमहापौर पदासाठी निवड करण्यात येणार आहे. या निवडण्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार आहेत.

6. मुंबईमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे. वायबी सेंटर इथं ही बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीच्या सत्रांमुळं सत्ता स्थापनेचं चित्र लवकरच स्पष्ट होईल असं सांगितलं जात आहे.

SPECIAL REPORT : काँग्रेसचा शिवसेनेच्या 'या' भूमिकाला विरोध?

Published by: Kranti Kanetkar
First published: November 22, 2019, 7:03 AM IST

ताज्या बातम्या