Home /News /maharashtra /

Sharad Pawar : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद तडकाफडकी बरखास्त, नवा अध्यक्ष कोण?

Sharad Pawar : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद तडकाफडकी बरखास्त, नवा अध्यक्ष कोण?

महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) होते ही परिषद बरखास्त करण्यात आल्याने पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

  मुंबई, 02 जुलै : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद (Maharashtra State Wrestling Council) रद्द करण्यात आल्याची माहितीसमोर आली आहे. भारतीय कुस्तीगीर संघटनेकडून (Indian Wrestling Association) हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) होते ही परिषद बरखास्त करण्यात आल्याने पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दिल्लीत झालेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काही दिवसात हंगामी समितीची निवड होईल अशी माहिती मिळत आहे. जिल्हा संघटना आणि काही पैलवानांकडून (wrestler) आलेल्या तक्रारींमुळे ही कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे.

  शरद पवार यांचे निकटवर्तीय भाजप खासदार बृजभुषण सिंग (bjp mp brijbhushan singh) हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. तर विनोद तोमर हे सचिव आहेत. बृजभुषण सिंग यांनी ही कारवाई ही केली असल्याने शरद पवार यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत तर बाबासाहेब लांडगे हे 40 वर्षांहून अधिक काळ सचिव आहेत. 

  हे ही वाचा : मुख्यमंत्री होणार हे तुम्हाला कधी समजलं? एकनाथ शिंदेंचं उत्तर वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

  बाबासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांपूर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलन करण्यात आले होते. भारतीय कुस्ती महासंघाकडे तक्रार देखील करण्यात आली होती. या बरखास्तीनंतर नव्याने निवडणूक घेऊन भारतीय कुस्तीगीर परिषद गठीत करण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे करण्यात येते.

  बृजभुषण सिंग आणि शरद पवार यांच्यात सलोख्याचे संबंध असल्याने ही कारवाई शरद पवार यांच्याविरोधात राजकीय भावनेतून नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मागच्या दोन महिन्यांपासून बृजभुषण सिंग हे महाराष्ट्रात परिचयाचे झाले आहेत. शरद पवारांवर राज ठाकरेंनी टीका केल्यानंतर बृजभुषण सिंग यांनी राज ठाकरेंना अंगावर घेतले होते. यातून भाजप खासदार सिंग यांचे नाव महाराष्ट्रात खूप गाजले होते.

  हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचं सुरतेच्या स्वारी आधीच ठरलं होतं? पडद्यामागची INSIDE STORY

  कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी ही परिषद स्थापन केली होती. या परिषदेकडून महाराष्ट्र केसरीचे आयोजन केले जाते. दरम्यान मागच्या 40 वर्षांपासून या परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आहेत तर बाळासाहेब लांडगे हे सचिव आहेत. लांडगे हे मनमानी कारभार करत असल्याने त्यांच्याविरोधात मागच्या काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते. यामुळे या नाराजीतून ही परिषद बरखास्त करण्यात आल्याची माहिती कुस्तीगीरांनी दिली आहे. दरम्यान यामध्ये शरद पवारांच्या विरोधात राजकारण नसल्याचेही कुस्तीगीरांनी सांगितले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Maharashtra News, Sharad Pawar (Politician), Wrestler

  पुढील बातम्या