मंदीत संधी! राज्यातल्या महिला गटाने फक्त मास्क विकून कमावले 17 लाख

मंदीत संधी! राज्यातल्या महिला गटाने फक्त मास्क विकून कमावले 17 लाख

Coronavirus च्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या घरातल्या पुरुषांचे रोजगार गेले. पण बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांनी संधीचं सोनं करून दाखवलं. या काळात त्यांनी अडीच लाखांहून मास्कची निर्मिती केली.

  • Share this:

अमरावती, 25 जून : एकीकडे Coronavirus च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढत होता आणि घरातल्या कमावत्या पुरुषांच्या हातून कामं निसटत होती. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातल्या काही स्त्रियांनी मात्र संधीचं सोनं करून दाखवलं. मंदीत संधी शोधली आणि केवळ दोन महिन्यात अडीच लाख मास्क निर्माण करून त्याच्या विक्रीतून सव्वा सतरा लाख रुपये कमावले. महिला बचत गटांतल्या दीड हजार महिलांनी ही कमाल करून दाखवली आहे.

महासंवाद या शासकीय वार्ता विभागाच्या वेबसाइटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात ग्रामपातळीवर काम करणाऱ्या महिलांनी ही मास्कनिर्मिती केली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून मास्क निर्मिती करण्याचं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना काळाच्या सुरुवातीला केलं होतं. उमेद अभियानात बचत गटांद्वारे सुमारे 1 लाख 46 हजार 930 मास्कची विक्री होऊन त्यांना आतापर्यंत 17 लाख 25 हजार 519 रूपये उत्पन्न मिळालं आहे.

कोरोना संकटकाळात मास्कनिर्मितीच्या कामाने जिल्ह्यात महिला बचत गटांना रोजगार पुरवला असून, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती

उधारी घेऊन केली UPSC ची तयारी, शेतकऱ्यांचा मुलगा झाला IAS

कोरोना विषाणूला प्रतिबंधासाठी कापडी मास्कची उपयुक्तता लक्षात घेऊन जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुती कापडाचे मास्क तयार करण्यासाचे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले होते. त्यांच्या प्रयत्नाने प्रारंभी कारागृहातील बंदीजनांकडून व त्यानंतर कस्तुरबा महिला बचत गट समितीकडून सोलर चरख्याच्या माध्यमातून मास्कनिर्मिती सुरू करण्यात आली. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातही बचत गटांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर मास्कनिर्मिती सुरु करण्यात आली.

धक्कादायक! राज्यसभेतील 16 खासदारांवर खून, बलात्कार, दरोडा सारखे गंभीर गुन्हे

उमेद अभियानात जिल्ह्यात स्वयंसहायता समूहांना मास्क बनविण्याकरिता व विक्रीकरिता जिल्हा व तालुका अभियान कक्ष समूहातील महिलांना मार्गदर्शन करत आहेत. जिल्ह्यात एकूण १७८ समूह हे मास्क बनविण्याच्या कामामध्ये गुंतलेले आहेत व समूहातील अंदाजे सुमारे दीड हजार भगिनींकडून उत्तम प्रकारची मास्क निर्मिती होत आहे. आजपर्यंत एक लाख ५१ हजार २५५ मास्कची निर्मिती झाली आहे. त्यापैकी १ लाख ४६ हजार ९३० मास्कची विक्री होऊन १७ लाख २५ हजार ५१० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

गावातल्या कोरोना वॉरिअर्स

कोरोना संकटकाळात अहोरात्र राबणाऱ्या जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभाग, वनविभाग तसेच विविध शासकीय तसेच निमशासकीय विभाग या महिलांना मास्क बनविण्याची ऑर्डर देत आहेत. ग्रामस्तरावर या महिला 'कोरोना वॉरिअर्स' म्हणून काम करत आहेत, अशी माहिती उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांनी दिली.

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता

या महिला स्थानिक प्रदेशात पिकणाऱ्या कापसापासून सुती कापड तयार करण्याचं कामही करतात. त्याचेच दुपदरी सुती मास्क त्या तयार करत असून ते साथीच्या काळात सुरक्षित आहेत. हे मास्क स्वच्छ धुवून पुनर्वापर करता येतो. स्वयंस्फूर्तीनेही अनेक गट यात सहभागी झाले असून, रोजगारही उपलब्ध होत आहे. अशा विविध बचत गटांकडून अद्यापपर्यंत अडीच लाखांवर मास्कनिर्मिती झाली आहे.

First published: June 25, 2020, 8:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading