Home /News /maharashtra /

कोर्टाच्या शिक्षेवर यशोमती ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया; राजीनाम्याच्या मागणीवर म्हणाल्या, 'अख्खा भाजप आता एका महिलेच्या मागे लागेल'

कोर्टाच्या शिक्षेवर यशोमती ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया; राजीनाम्याच्या मागणीवर म्हणाल्या, 'अख्खा भाजप आता एका महिलेच्या मागे लागेल'

पोलीस कर्मचाऱ्यावर हात उगारल्याच्या प्रकरणात महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur news) यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यांना जामीन मिळाला असला, तरी भाजपने ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुंबई, 15 ऑक्टोबर : काँग्रेसच्या (Maharashtra congress) आक्रमक नेत्या आणि महिला - बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना न्यायालयाने आठ वर्षं जुन्या प्रकरणात गुरुवारी दोषी ठरवलं. त्यांना तीन महिने तुरुंगवास आणि 15000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ठाकूर यांची जामिनावर सुटका झाली आहे. पण भाजपने यावर यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सगळ्या प्रकरणावर यशोमती ठाकूर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'न्यायालयीन प्रक्रियेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या क्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल', असं यशोमती ठाकूर निकालानंतर म्हणाल्या. भाजपने केलेल्या राजीनामा देण्याच्या मागणीबाबत त्या म्हणाल्या, 'एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील.' काय आहे प्रकरण? 24 मार्च 2012 रोजी अमरावतीच्या प्रसिद्ध अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाची हुज्जत घातल्या प्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस कॉन्सेटबलवर हात उगारल्याचाही आरोप होता. त्यावर गुरुवारी जिल्हा न्यायालायात सुनावणी पूर्ण झाली. न्या. उर्मिला जोशी यांनी यशोमती ठाकूर यांना प्रकरणात शिक्षा सुनावली. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. या प्रकरणाचा सविस्तर निकाल अद्याप हाती आलेला नाही. यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. VIDEO: काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा हॉस्पिटलमध्ये राडा; पोलिसांवर भडकल्या पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत घातली. सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण आदी कलमं यशोमती ठाकुरांवर लावण्यात आली होती. ठाकूर यांची जामिनावर सुटकाही झाली आहे. यशोमती ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया गेल्या वर्षी मुंबईतल्या हॉस्पिटलमध्येही यशोमती पाटील यांनी रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याची बातमी समोर आली होती. आमदारांना भेटू का दिलं जात नाही, असं म्हणत त्यांनी रुग्णालयात राडा घातल्याचा VIDEO व्हायरल झाला होता. न्यायालयीन प्रक्रीयेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या क्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल. बाकी राजीनामा देण्याच्या मागणी बाबत, तर एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे, आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: BJP, Congress, Yashomati thakur

पुढील बातम्या