महाराष्ट्र साखर उत्पदानाचे सर्व विक्रम मोडणार, साखरेचं तब्बल 292 लाख उत्पादन अपेक्षित

दरवर्षी राज्यात 250 ते 260 लाख टन उत्पादन होतं. त्यात यावर्षी 30 ते 35 लाख टनांची भर पडणार आहे. या घसघशीत उत्पादनवढीचा साखरेच्या बाजारावर मोठा परिणाम होण्याची भिती आहे.

दरवर्षी राज्यात 250 ते 260 लाख टन उत्पादन होतं. त्यात यावर्षी 30 ते 35 लाख टनांची भर पडणार आहे. या घसघशीत उत्पादनवढीचा साखरेच्या बाजारावर मोठा परिणाम होण्याची भिती आहे.

  • Share this:
संदीप भुजबळ,प्रतिनिधी मुंबई, 27 फेब्रुवारी : साखरेच्या उत्पादनाचे आजवरचे सगळे विक्रम महाराष्ट्र यावर्षी मोडीत काढणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी साखर उत्पादनात तब्बल 12 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जातेय. दरवर्षी देशाचं 250 ते 260 लाख टन उत्पादन होतं. त्यात यावर्षी 30 ते 35 लाख टनांची भर पडणार आहे. या घसघशीत उत्पादनवढीचा साखरेच्या बाजारावर मोठा परिणाम होण्याची भिती आहे. येत्या काळात साखरेचे भाव टिकवणे आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळवून देणे हे सरकार समोरचं मोठं आव्हान असणार आहे.इंडियन शुगर मील्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात साखरेचे उत्पादन 261 लाख टन होणे अपेक्षीत होते. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या उत्पादनवाढीने सगळ्यांचेच अंदाज चुकले आहेत. साखरेच्या वाढलेल्या उत्पादनामुळे देशात गेल्या 4 महिन्यात साखरेच्या बाजारभावात 11 टक्क्यांची घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्यासाठी छोट्या साखर कारखान्यांनी साखर विक्रीचा धडाका लावला आहे. परिणामी साखरेच्या बाजारात घसरण होत गेली. त्याचा परिणाम पुन्हा कारखान्यांना मिळणाऱ्या पैशांवर आणि उसाचे पैसे शेतकऱ्यांना देण्यावर झालाय.एकट्या महाराष्ट्रातच सध्या अंदाजे 2.5 हजार कोटी रुपयांची उसाची बिले थकीत आहेत. साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यातीवर अनुदान देणे गरजेचे असल्याचं मत वेस्टर्न शुगर मील्स असो.चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर केंद्र सरकारने तातडीने हालचाली करत साखरेचा मोठा बफर साठा बनवण्याचा निर्णय घेणे अपेक्षीत आहे. सध्या पाकिस्तानकडून साखरेच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. परिणामी तिथली स्वस्त साखर सहजरित्या भारतीय बाजारात येऊन देशांतर्गत बाजारात साखरेचे भाव पडत आहेत.गेल्यावर्षी देशात साखरेचे 203 लाख टन उत्पादन झाले होते. त्यात महाराष्ट्राचा अवघा 42 लाख टनांचा वाटा होता. पण यंदा देशाच्या उत्पादनात अंदाजे 89 लाख टनांची आणि महाराष्ट्राच्या उत्पादन 40 लाख टनांनी भर पडली आहे.
First published: