Home /News /maharashtra /

Maharashtra Weather Update: राज्यात हुडहुडी कायम..! मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये तापमान घसरलं

Maharashtra Weather Update: राज्यात हुडहुडी कायम..! मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये तापमान घसरलं

Maharashtra Weather Updates: राज्यातल्या तापमानात (Temperature) आणखीन घट झाली आहे. तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या तापमानात कमालीचं घट झाली आहे.

    मुंबई, 26 जानेवारी: राज्यातल्या तापमानात (Temperature) आणखीन घट झाली आहे. तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या तापमानात कमालीचं घट झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटेचं तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं. (Maharashtra Weather Update) वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे राज्यातल्या तापमानात घट झाली आहे. या पश्चिमी वाऱ्यांमुळे दरवर्षी उत्तर भारतात थंडीची लाट येते. मात्र यंदा उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातातही त्याचा प्रभाव जाणवत आहे. विदर्भात थंडीची लाट पुढील दोन दिवस नागपूरसह विदर्भात थंडीची लाट राहणार असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केलीय. राज्याच्या उपराजधानीतही कडाक्याची थंडी आहे. आज नागपुराचा पारा हा 10.2 अंश सेल्सिअसवर होता. विदर्भात सर्वाधिक कमी तापमान 9.2 अंश सेल्सिअस बुलढाणा येथे नोंदविले गेले. विदर्भात काल पासून थंडीची तीव्रता वाढत असल्याने पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळच्या वेळेस घराबाबाहेर उबदार कपडे घातल्याशिवाय पडणे अवघड झाले आहे. शहरात ठिकाठिकाणी शेकोटी लावलेल्या दिसत आहे. Elegant Photos: विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा दोन दिवसात अचानक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवस राज्यात (Maharashtra Weather Forecast) किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. हवामान विभागानं (IMD) याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यातील तापमान आणखीन घसरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली असेल. तसंच मुंबईतील दिवसा कमाल तापमानातही घट झाली आहे. हे कमाल तापमान 23 ते 26 अंश नोंदवण्यात आल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मुंबई आणि पुणेकरांनो काळजी घ्या, राज्यात धडकले धुळीचे वादळ राज्यात धुळीचे वादळ (Dust storm in Maharashtra ) धडकले आहे. त्यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रत दृश्यमानता कमी झाली आहे. धुलीकणाच्या वादळाने राज्यात काल दिवसभर वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्र मार्गे महाराष्ट्रत पोहोचले आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृश्यमानता कमी झाली असून मुंबई पुण्यात धुळीकणांचे प्रमाण वाढले आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Todays weather

    पुढील बातम्या