मुंबई, 9 जून: रात्रीपासूनच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत जिल्ह्यांत जोरदार पाऊस (Heavy rain) कोसळत आहे. मुंबई, ठाण्यात आज रेड अलर्ट (Mumbai, Thane red alert) जाहीर करण्यात आला आहे. तर पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई (heavy rainfall in Mumbai) झाल्याचं पहायला मिळालं. त्याच दरम्यान आता राज्यातील काही भागांत मुसळधार (Heavy rainfall) ते अतिमुसळधार पाऊस (Extremely heavy rainfall) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.
15 जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
हवामान खात्याचे हवामानतज्ज्ञ के एस होसळीकर यांनी ट्विट करुन आगामी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. होसळीकर यांनी म्हटलं, 11 जून रोजी बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीच्या भागात पहायला मिळेल. यामुळे 9 जून रोजी आणि 12 ते 15 जून रोजी कोकणातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Due to strengthening of westerly winds along west coast in due to Low Pressure area over Bay on 11 Jun ; widespread rainfall activity with hvy to very hvy falls likely to cont over Konkan during 9-15 June. Isol extremely hvy falls very likely ovr Konkan on 9 & 12-15 June. TC IMD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 9, 2021
मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प तर रस्त्यावर पाणी साचल्याने चाकरमान्यांचा खोळंबा
मुंबई-ठाण्यात रेड अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. याच दरम्यान हवामान विभागाने मुंबई-ठाण्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. तर त्यानंतरचे पुढील तीन दिवस मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी पाच दिवस ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी जिल्ह्यात 9 जून ते 13 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पावसाचं धुमशान; मुंबईत पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी
IMD issues red alert in Mumbai, Palghar & Thane districts for today and orange alert for the next four days pic.twitter.com/wG8uz5XdNT
— ANI (@ANI) June 9, 2021
विदर्भातील जिल्हावार हवामानाचा अंदाज
10 जून
नागपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
वर्धा - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
भंडारा - एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्या कडकटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)
गोंदिया - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)
चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)
11 जून
नागपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
वर्धा - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
भंडारा - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
गोंदिया - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)
चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Mumbai, Rain