मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Weather Update : संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट, असा असेल पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update : संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट, असा असेल पावसाचा अंदाज

पावसाने पुन्हा थैमान घालायला सुरूवात केली आहे. मागच्या चार दिवसांपासून हवामान खात्याकडून पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. (Maharashtra Weather Update)

पावसाने पुन्हा थैमान घालायला सुरूवात केली आहे. मागच्या चार दिवसांपासून हवामान खात्याकडून पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. (Maharashtra Weather Update)

पावसाने पुन्हा थैमान घालायला सुरूवात केली आहे. मागच्या चार दिवसांपासून हवामान खात्याकडून पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. (Maharashtra Weather Update)

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 10 सप्टेंबर : काही दिवसांची उघडीप मिळाल्यानंतर पावसाने पुन्हा थैमान घालायला सुरूवात केली आहे. मागच्या चार दिवसांपासून हवामान खात्याकडून पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. (Maharashtra Weather Update) दरम्यान राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाकडून राज्यात पावासाचा इशारा देण्यात आला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागाने पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हे ही वाचा : हे चित्र बरं दिसत नाही, पुढच्या वर्षी समुद्रात विसर्जन नको, अमित ठाकरेंचं आवाहन

मान्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान असल्याने राज्याच्या विविध भागात विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Rain Maharashtra Update) तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कमी झाला असला तरी राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उद्यापासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : बाप्पाला निरोप देताना मोठी दुर्घटना; यवतमाळमध्ये दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान मागच्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात खेड-26, लांजा-30, चिपळूण-39, देवरुख-9, राजापूर-8, मंडणगड-1, दापोली-27, गुहागर-5, वाकवली-11, बीड जिल्ह्यात झाले पाऊस आष्टी- 18, धारूर- 8, माजलगाव-4, अंबेजोगाई-20, शिरूर कासार-0, परळी -13

First published:

Tags: Monsoon, Mumbai rain, Pune rain, Rain in kolhapur, Todays weather, Weather update, Weather warnings

पुढील बातम्या