• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Maharashtra Weather Today: पुण्यात पहाटे मेघगर्जनेसह पाऊस; तर विदर्भात गारपीटीचा इशारा

Maharashtra Weather Today: पुण्यात पहाटे मेघगर्जनेसह पाऊस; तर विदर्भात गारपीटीचा इशारा

Maharashtra Weather Update: मागील आठवड्यापासून महाराष्ट्रातील वातावरणाचं संतुलन बिघडलं आहे. काही दिवस तापमानाचा पारा चढा राहिल्यानंतर आता महाराष्ट्रात तापमानाचा पारा अचानक घसरला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 • Share this:
  पुणे, 11 एप्रिल: मागील आठवड्यापासून महाराष्ट्रातील वातावरणाचं (Maharashtra Weather Today) संतुलन बिघडलं आहे. काही दिवस तापमानाचा पारा चढा राहिल्यानंतर आता महाराष्ट्रात अचानक तापमानाचा पारा घसरला आहे. आज सकाळी पुण्यात 10 वाजेपर्यंत सुर्याचं दर्शनही झालं नाही. तर दिवसभर ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस पुण्यातील हवामान ढगाळ राहणार आहे. आज पहाटे पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पुढील 3-4 दिवस परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे... मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. काल पश्चिम महाराष्ट्रावर साचलेले काळ्या ढगांनी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याकडे आगेकूच केली आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी पुढील पाच दिवस योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीवर उच्च दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, कोकण किनाऱ्यासह मुंबई, ठाणे, सातारा या जिल्ह्यातील ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (हे वाचा-देशात कोरोना रुग्णांचा महाविस्फोट; 24 तासांत दीड लाखाहून अधिक रुग्णांची नोंद) सध्या महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात असताना, हवामानात झालेले बदल नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. दररोज हजारो नव्या रुग्णांची भर पडत आहे. अशा परिस्थिती हवामानात झालेल्या बदलामुळे सर्दी, शिंका येणे, ताप, थंडी वाजून येणे, अशा सामान्य आजारांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. सामान्य सर्दीमुळेही कोरोना झाल्याची भीती मनात येई शकते. त्यामुळे अशा आजाराला न घाबरता वैद्यकीय सल्ला घ्यावा.
  Published by:News18 Desk
  First published: