महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात आजपासून दुपारी 2 पर्यंतच बँकेत सुरू राहणार व्यवहार!

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात आजपासून दुपारी 2 पर्यंतच बँकेत सुरू राहणार व्यवहार!

बँकांमध्ये (Bank) नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.

  • Share this:

नरेंद्र मते, वर्धा, 19 एप्रिल : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी संचारबंदी लागू करत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र अशा स्थितीतही बँकांमध्ये (Bank) नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे आता वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी (Wardha District) जिल्ह्याच्या सर्व बँकांमध्ये ग्राहक सेवेच्या व्यवहाराची वेळ दुपारी 2 वाजेपर्यंतच केली आहे. आजपासूनच हा आदेश लागू होणार आहे.

संचारबंदी असली तरी अत्यावश्यक सेवेच्या नावावर नागरिकांची बाजार मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. यामुळे जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेच्या दुकानांच्या वेळेत बदल करत दुकाने दोन वाजेपर्यंत उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. अशातच बँकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत होते. यामुळे जिल्हाधिकारी यांनी बँकांच्या ग्राहक सेवेच्या वेळेत बदल करत दुपारी दोन वाजेपर्यंतच ठेवली आहे.

बँकांचं कार्यालयीन कामकाज हे नियमित वेळेत सुरू राहील, मात्र बँकांच्या व्यवहाराची वेळ बदलण्यात आली आहे. हा आदेश 1 मे पर्यंत लागू राहणार आहे. जिल्हाधिकारी यांचे आदेश येताच अग्रणी जिल्हा प्रबंधकांनी या सूचना जिल्ह्याच्या सर्व बँकांना दिल्या आहेत.

हेही वाचा - राज्यातील परिस्थिती गंभीर; प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव

शनिवारी वर्धा जिल्ह्यात 613 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 13 जणांनी आपले जीव गमावला आहे.

नेमकी काय आहे स्थिती?

आयसोलेशनमध्ये असलेले एकूण रुग्ण - 4151

आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने - 235478

अहवाल प्राप्त - 235458

निगेटिव्ह -207307

प्रलंबित अहवाल- 20

जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या - 26368

शनिवारी कोरोनामुक्त- 395

एकूण कोरोनामुक्त - 21647

एकूण मृत्यू 552

Published by: Akshay Shitole
First published: April 19, 2021, 12:43 PM IST

ताज्या बातम्या