पावसाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी मांडली 10 विधेयकं

पावसाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी मांडली 10 विधेयकं

मुंबईत आमदार निवासाचे काम सुरू असल्यामुळे तब्बल ४७ वर्षांनी राज्याची उपराजधानी नागपुरात पावसाळी अधिवेशन होतंय

  • Share this:

नागपूर, 04 जुलै : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झालीय. पहिल्याच दिवशी 10 विधेयकं मांडण्यात आली. हैद्राबाद अतियात विधेयक आणि महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा अशी दोन विधेयकं मागे घ्यायला राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला. हे विधेयक चर्चेचे असल्याने ते आज मांडू नये असा आक्षेप अजित पवार यांनी घेतला. यावर सभागृह नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय स्वीकारला. या कामकाजानंतर कृषी मंत्री भावसाहेब फुंडकरसह दिवंगत झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

हेही वाचा: 47 वर्षांनंतर नागपुरात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन!

अडीच आठवड्याच्या या अधिवेशनात संपूर्ण राज्याचे विषय येणार असल्यानं या अधिवेशनातून विदर्भाला काही फार अपेक्षा नसल्याचं सांगितलं जातंय. मुंबईत आमदार निवासाचे काम सुरू असल्यामुळे तब्बल ४७ वर्षांनी राज्याची उपराजधानी नागपुरात पावसाळी अधिवेशन होतंय. पण तीन आठवडे चालणारं हे अधिवेशनही नेहमीप्रमाणे औपचारिकताच ठरेल असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे. हे अधिवेशन राज्यासाठी आहे त्यामुळे विदर्भाला त्याकडून फार काही अपेक्षा नाही. सरकारच्या अंतर्गत अडचणीमुळे हे अधिवेशन नागपुरात आहे अशी प्रतिक्रिया विदर्भवादी श्रीनिवास खांदेवाले यांनी दिली.

हेही वाचा: भारत- इंग्लंड सामन्यात 'या' 7 विक्रमांची नोंद, विराटच्या नावे दोन विक्रम

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका बघता पावसाळी आणि दोन्ही हिवाळी अधिवेशनं विदर्भात घेण्याचा निर्णय घेतल्याच सांगितलं जातंय. गेल्या काही अधिवेशनात पुरेसा वेळ न मिळाल्याने सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर फारसा प्रकाश टाकण्यात आला नाही. या अधिवेशात तरी सामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होईल हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा: पुण्यात हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन जवानासह चार जण जखमी

First published: July 4, 2018, 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading