विधानसभेआधी राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ, शरद पवार करणार बदल

विधानसभेआधी राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ, शरद पवार करणार बदल

विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, अशी शरद पवार यांची भूमिका आहे.

  • Share this:

मुंबई, 31 मे : लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीआधी राष्ट्रवादीत मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तसे संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, अशी शरद पवार यांची भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पक्षातील साचलेपण दूर करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून हे पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीत नेमके काय बदल होतात, हे पाहावं लागेल.

दरम्यान, गुरुवारी झालेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशी चर्चा रंगत होती. याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

'राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

VIDEO : नाशिकची 'लेडी सिंघम', दरोडेखोरासोबत एकटीने दिली झुंज

First published: May 31, 2019, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading