महाराष्ट्राचा महासंग्राम : कोथरुडमध्ये उमेदवारीची बाजी कोण मारणार?

2014 मध्ये भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात वाद झाला होता. शिवसेनेमध्येही चंद्रकांत मोकाटे आणि श्याम देशपांडे यांच्यामध्ये उमेदवारीवरून स्पर्धा पाहायला मिळाली होती.आता कोथरुडमधून हे चारही जण विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 05:11 PM IST

महाराष्ट्राचा महासंग्राम : कोथरुडमध्ये उमेदवारीची बाजी कोण मारणार?

पुणे, 10 सप्टेंबर : कोथरुड विधानसभा मतदारसंघावर भाजपची जोरदार पकड आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघात दणदणीत मताधिक्य मिळवलं. त्यांना काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यापेक्षा एक लाख मतं जास्त मिळाली. आता गिरीश बापट खासदार झाल्याने इथे आमदारकीसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा आहे.

2014 मध्ये भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात वाद झाला होता. शिवसेनेमध्येही चंद्रकांत मोकाटे आणि श्याम देशपांडे यांच्यामध्ये उमेदवारीवरून स्पर्धा पाहायला मिळाली होती.आता कोथरुडमधून हे चारही जण विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा

2014 ला भाजप-शिवसेनेची युती तुटली आणि त्याचा फायदा भाजपने उठवला. भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी मिळते याबद्दलही उत्सुकता आहे. इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवारच नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मनसे सहभागी झाली तर हा मतदारसंघ मनसेकडे जाऊ शकतो. मनसेच्या किशोर शिंदेंनी इथून 2 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे.

भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला अशी कोथरुड विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. याही निवडणुकीत ही परंपरा कायम राखत भाजप हा बालेकिल्ला राखणार का याची उत्सुकता आहे. सध्या तरी इथे भाजपचं पारडं जड दिसतंय.

Loading...

2014 विधानसभा निवडणुकीतलं मतदान

मेधा कुलकर्णी, भाजप- 1 लाख 941

चंद्रकांत मोकाटे, शिवेसना 36 हजार 279

========================================================================================

VIDEO : आदित्य ठाकरे लालबाग राजाच्या चरणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...