'आज सरकार मीच आहे', पंकजा मुंडेंच्या विधानाची पुन्हा चर्चा

'आज सरकार मीच आहे', पंकजा मुंडेंच्या विधानाची पुन्हा चर्चा

दुष्काळग्रस्तांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी 'आज सरकार मीच आहे' असं विधान केलं आहे.

  • Share this:

बीड, 7 जुलै : भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) या त्यांच्या विधानांनी अनेकदा चर्चेत येतात. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडेंच्या बीडमधील विधानाची जोरदार चर्चा होत आहे. दुष्काळग्रस्तांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी 'आज सरकार मीच आहे' असं विधान केलं आहे.

महाराष्ट्रात पावसाचं आगमन झाल्यानंतरही अनेक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे. परळीतीही अनेक भागात आजही टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. याचाच आढावा घेण्यासाठी बीडच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी विविध वॉर्डांना भेट दिली. यावेळी टँकरद्वारे पाणी घेणाऱ्या ग्रामस्थांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'पाणी पुरवठ्यात कोणतीही अडचण येत असेल तर मला सांगा. हे टँकर नगरपालिकेचे नाहीत तर सरकारकडून देण्यात येत आहेत आणि आज सरकार मीच आहे.' याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतांश भाग मागील वर्षी भीषण दुष्काळाने होरपळून निघाला. बीडमध्ये अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागला. आता मान्सूनचं आगमन झालं असलं तरीही टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे.

राज्यातल्या बहुतांश भागात धो-धो बरसणारा पाऊस अजूनही मराठवाड्यावर रुसला आहे. कारण आठही जिल्ह्यात म्हणजे उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबादमध्ये पेरणीपुरताही पाऊस पडलेला नाही. प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार आठही जिल्ह्यात मिळून आतापर्यंत फक्त 12 टक्के इतकीच पेरणी झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातले लाखो शेतकरी रोज आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे वरुणराजा उशिरा का होईना बळीराजावर कृपादृष्टी दाखवतो का, हे पाहावं लागेल.

SPECIAL REPORT : रेल्वेखाली जीव देणाऱ्या आजोबांसाठी असा ठरला जवान 'देवदूत'

First published: July 7, 2019, 9:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading