भुजबळांच्या अडचणी वाढल्या, कट्टर समर्थकच आव्हान देण्याच्या तयारीत

भुजबळांच्या अडचणी वाढल्या, कट्टर समर्थकच आव्हान देण्याच्या तयारीत

विधानसभा निवडणुकीसाठी 4 महिन्याचा कालावधी असताना येवल्यात आतापासूनच निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे.

  • Share this:

बब्बू शेख, नाशिक, 13 जुलै : येवला मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मतदारसंघात आपल्याच समर्थकांकडून आव्हान मिळू लागलं आहे. भुजबळांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माणिकराव शिंदे यांनी येवल्यातून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी 4 महिन्याचा कालावधी असताना येवल्यात आतापासूनच निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक मानले जाणारे माणिकराव शिंदे यांनी यंदा उमेदवारीवर दावा ठोकून खळबळ उडवून दिली आहे. तिकडे वैजापूरचे कार्यकर्ते उमेदवारी करण्यास भुजबळांच्या उमेदवारीची मागणी करत आहेत.

या घडामोडींनंतर अखेर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी कुठून उमेदवारी करायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. त्यामुळे पक्षाचा जो आदेश येईल त्यानुसार मी निवडणूक लढेन, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, छगन भुजबळ हे गेल्या तीन टर्मपासून येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यंदा मात्र ते वैजापूर या औरंगाबाद जिल्ह्यातील मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. भुजबळ यांनी वैजापूरमधून लढावं यासाठी त्यांचे कार्यकर्तेही आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी भुजबळ यांची भेट घेतली आहे.

येवला मतदारसंघात निर्माण झालेले आव्हान लक्षात घेता छगन भुजबळ यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगत आहे. कारण या मतदारसंघात शिवसेनेकडून चांगली बांधणी करण्यात आली आहे. तसंच जेलवारी केल्यानंतर भुजबळ यांच्या राजकीय वर्चस्वालाही धक्का बसला आहे.

एकेकाळी नाशिक हा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला होता. पण तुरुंगात गेल्यानंतर त्यांचं कार्यकर्त्यांचं जाळं विस्तारलं. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी आपलं वर्चस्व पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र ते होऊ शकलं नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांची पद्धतशीर कोंडी केली. या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना दुसऱ्यांदा पराभव सहन करावा लागला.

VIDEO:माकडाचा 98 तास मृत्यूशी संघर्ष; अधिकाऱ्यांनी लावली जीवाची बाजी

First published: July 13, 2019, 11:42 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading