विखेंकडून काँग्रेसला पहिला सुरुंग? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आमदाराचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता

विखेंकडून काँग्रेसला पहिला सुरुंग? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आमदाराचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता

विखेंच्या संपर्कात असलेले काँग्रेसमधील नाराज आमदार भाजप प्रवेशाच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.

  • Share this:

सोलापूर, 11 जुलै : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामागे अनेक कारणं होती. पण आघाडीतील नेत्यांचं सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत होत असलेलं आऊटगोईंग हेदेखील या पराभवाचं महत्त्वाचं कारण होतं. अशातच आता विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच पॅटर्नचा अवलंब करण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारमधील विद्यमान मंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये राहून भाजपला मदत केली. त्यानंतर निवडणुकीचा निकाल पुन्हा एनडीएच्याच बाजूने लागल्याचं दिसताच विखेंनी भाजपमध्ये उडी घेतली. त्यानंतर विखेंसोबत काँग्रेसमधील इतरही आमदार जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यावेळी विखे यांनी एकट्यानेच भाजपमध्ये प्रवेश केला. आता मात्र पुन्हा एकदा विखेंच्या संपर्कात असलेले काँग्रेसमधील नाराज आमदार भाजप प्रवेशाच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.

पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज भारत भालके यांची भेटही घेणार आहेत. ही सदिच्छा भेट आहे, असं सांगितलं जात आहे. मात्र आमदार भालके यांना विखेंच्या माध्यमातून युतीत आणण्याचे काम केले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

SPECIAL REPORT : भक्तांची अलोट गर्दी जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करून देते!

First published: July 11, 2019, 11:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading