छगन भुजबळ 15 वर्षांनंतर बदलणार मतदारसंघ? 'या' तालुक्यातून लढण्याची शक्यता

छगन भुजबळ 15 वर्षांनंतर बदलणार मतदारसंघ? 'या' तालुक्यातून लढण्याची शक्यता

छगन भुजबळ हे गेल्या तीन टर्मपासून येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 11 जुलै : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ हे आपला मतदारसंघ बदलण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळ हे गेल्या तीन टर्मपासून येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यंदा मात्र ते वैजापूर या औरंगाबाद जिल्ह्यातील मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. भुजबळ यांनी वैजापूरमधून लढावं यासाठी त्यांचे कार्यकर्तेही आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते लवकरच यासाठी भुजबळ यांची भेट घेणार आहेत. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.

येवला मतदारसंघात निर्माण झालेले आव्हान लक्षात घेता छगन भुजबळ यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगत आहे. कारण या मतदारसंघात शिवसेनेकडून चांगली बांधणी करण्यात आली आहे. तसंच जेलवारी केल्यानंतर भुजबळ यांच्या राजकीय वर्चस्वालाही धक्का बसला आहे.

दरम्यान, एकेकाळी नाशिक हा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला होता. पण तुरुंगात गेल्यानंतर त्यांचं कार्यकर्त्यांचं जाळं विस्तारलं. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी आपलं वर्चस्व पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र ते होऊ शकलं नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांची पद्धतशीर कोंडी केली. या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना दुसऱ्यांदा पराभव सहन करावा लागला.

VIDEO: भरधाव कारची दुकानाला धडक, अपघाताची घटना CCTVमध्ये कैद

First published: July 11, 2019, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading