मुहूर्त ठरला! भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे - पाटील या दिवशी घेणार मंत्रिपदाची शपथ

मुहूर्त ठरला! भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण  विखे - पाटील या दिवशी घेणार मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Vidhan Sabha election : राधाकृष्ण विखे - पाटील पुढील दोन दिवसामध्ये भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, सागर कुलकर्णी, 04 जून : काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी विरोधपक्षनेते राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर विखे – पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. शिवाय, पुढील दोन दिवसामध्ये राधाकृष्ण विखे – पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांना मंत्रिपदाची शपथ देखील दिली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांनी 'न्यूज18 लोकमत'ला याबाबतची माहिती दिली आहे. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आघाडीच्या प्रचारापासून दूर राहणं पसंत केलं होतं. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाविषयी चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर राधाकृष्ण विखे – पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून पुढील दोन दिवसामध्ये ते मंत्रिपदाची शपथ देखील घेण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील काँग्रेसच्या या बड्या नेत्याच्या प्रवेशाला भाजपमधूनच विरोध!

भाजप देणार पवारांना शह?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना होम टाऊनमध्ये शह देण्यासाठी आता भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत. कारण, काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री करण्याची हालचाल भाजपनं सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता पुण्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागा वाटपावरून नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांचा मुलगा डॉ. सुजय विखे – पाटील यांनी कमळाला हात देत भाजपच्या तिकीटावर नगरमधून लोकसभा निवडणूक लढवली. या लढतीत डॉ. सुजय विखे – पाटील यांनी विजय देखील मिळवला. हा विजय आपण आजोबांना अर्पण करत असल्याचं म्हणत त्यांन शरद पवारांना टोला हाणला. त्यानंतर भाजप आणखी एक धक्का शरद पवार यांना देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सध्या रणनीती आखली जात आहे.

VIDEO: 'मुस्लिम मतांची साथ न मिळाल्यानं वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका'

First published: June 4, 2019, 1:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading