युतीमध्ये पुन्हा ठिणगी; मित्रपक्षांना कमळ चिन्ह देण्याचा भाजपचा प्लॅन!

युतीमध्ये पुन्हा ठिणगी; मित्रपक्षांना कमळ चिन्ह देण्याचा भाजपचा प्लॅन!

Maharashtra Vidhan Sbha election : विधानसभा निकालापूर्वी शिवसेना - भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

  • Share this:

मुंबई, उदय जाधव, 04 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेना – भाजप युतीत जागा वाटपावरून तणाव निर्माण झाला आहे. कारण, लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार मित्र पक्षांना जागा सोडून 50-50चा फॉर्म्युला हा ठरलेला आहे. पण, भाजपनं मात्र नवा प्लॅन केला आहे. त्यानुसार शिवसेना – भाजप 135 – 135 जागांवर लढतील. तर, मित्रपक्षांना 18 जागा देण्यात येणार असून त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबतच विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावरून युतीत ठिणगी पडली आहे.

शिवसेना - भाजपमध्ये विधानसभेच्या 288 जागांसाठी 144 -144 असा फॉर्म्युला ठरलेला होता. पण, चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पण, शिवसेना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असून त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या कराराची आठवण करू दिली जाणार आहे.

शरद पवारांना शह देण्यासाठी भाजपचं 'पालकमंत्री पॉलिटिक्स'; या 2 तगड्या नेत्यांची नावं चर्चेत

काय म्हणाले गिरीश महाजन

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घटक पक्षांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी इच्छा असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतील असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपचा नेमका प्लॅन काय? याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मी आणि उद्धव ठाकरे ठरवू तो निर्णय अंतिम असेल असं म्हटलं होतं. पण, आता भाजपमधील मंत्र्यांनी केलेल्या विधानावरून नव्या वादाला सुरूवात झाली आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून शिवसेना – भाजपनं युतीचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे.

VIDEO: प्रकाश आंबेडकरांनी राजू शेट्टींना दिली 'ही' ऑफर

First published: June 4, 2019, 3:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading