काँग्रेसच्या गोटात खळबळ; 8 ते 10 आमदार भाजपच्या वाटेवर?

काँग्रेसच्या गोटात खळबळ; 8 ते 10 आमदार भाजपच्या वाटेवर?

Maharashtra Vidhan Sabha election : 8 ते 10 आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

मुंबई, 04 जून : ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले 8 ते 10 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होणार का? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. शिवाय, काँग्रेसमध्ये देखील खळबळ उडाली आहे. तर, राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वानं पक्षाला संपवल्याचा आरोप देखील सत्तार यांनी यावेळी केला आहे. ANI या वृत्त संस्थेशी बोलताना त्यांनी हा दावा केला. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं सत्तार नाराज होते. त्यानंतर त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

युतीमध्ये पुन्हा ठिणगी; मित्रपक्षांना कमळ चिन्ह देण्याचा भाजपचा प्लॅन!

अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर

काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या काही आमदारांसह खलबतं देखील केली. यावेळी भारत भालके, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार आणि माढाचे खासदार रणजित निंबाळकर देखील हजर होते. त्यामुळे काँग्रेसच्या काही आमदारांसह राधाकृष्ण विखे – पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

VIDEO: काँग्रेसमधल्या कोंडीमुळे राजीनामा दिला, विखे-पाटलांनी व्यक्त केली खदखद

First published: June 4, 2019, 4:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading