महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांचा वेगळ्या विदर्भासाठी मोर्चा, पोलिसांचा लाठीचार्ज

महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांचा वेगळ्या विदर्भासाठी मोर्चा, पोलिसांचा लाठीचार्ज

  • Share this:

नागपूर, 01 मे : एकीकडे राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना, नागपुरात वेगळ्या विदर्भासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. या लाठीचार्जमध्ये एक जण जखमी झाल्यामुळे उपराजधानीत तणावाचं वातावरण आहे.

1 मे हा काळा दिवस पाळत, विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त मोर्चा काढला. विधानभवनाच्या दिशेनं निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी कस्तूरचंद पार्कजवळ अडवलं. तसंच संतप्त झालेल्या मोर्चेकरांवर लाठीचार्ज केला. यात रवी वानखेडे नावाचा कार्यकर्ता जखमी झाला.

आंदोलनात सहभागी झालेले ज्येष्ठ विदर्भवादी नेते वामनराव चटप, राम नेवले, निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रबीर चक्रवती आणि माजी आमदार सरोजताई काशीकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपुरात 45 अंश सेल्सियस तापमान असताना देखील शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

First published: May 1, 2018, 11:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading