मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 5 जनावरे दगावली, शेतीचेही प्रचंड नुकसान

राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 5 जनावरे दगावली, शेतीचेही प्रचंड नुकसान

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 2 मे: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान (Unseasonal rain in Maharashtra) घातल्याचं पहायला मिळत आहे. राज्यातील विविध भागांत तापमानात घट होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस (heavy rain) कोसळत असल्याचं पहायला मिळत आहे. तर काही भागांत कमाल तापमानात वाढ झाल्याचं दिसत आहे. अवकाळी पावसामुळे आज राज्यात 7 नागरिकांनी आपले प्राण (7 died as lightning) गमावले आहेत. तर 5 जनावरेही दगावले असल्याची माहिती समोर आली आहे. तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाहूयात राज्यातील कुठल्या भागात अवकाळी पावसाचे थैमान पहायला मिळत आहे. बीडमध्ये गर्भवती महिलेसह दोघांचा मृत्यू, 5 जनावरे दगावली बीड जिल्ह्यात आज झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस सुरू असतानाच वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. बीड तालुक्यातील गर्भवती महिलेसह केज तालुक्यातील अन्य एका महिलेचा मृत्यू झाला. तर, अंबाजोगाईत आणि बीडच्या सानपवाडीतील पाच जनावरे मृत्युमूखी पडले. बीड जिल्ह्यात आज विजांचे अक्षरश : तांडव पाहायला मिळाले बीड, केज आणि अंबाजोगाई तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. बीड तालुक्यातील नेकनूरच्या लोखंडे वस्तीवरील राधाबाई दिपक लोखंडे (वय २०) ही महिला दुपारी शेतात काम करत होती. पाऊस सुरू झाल्याने ती घराकडे परतत असताना तिच्यावर वीज कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर राधाबाईच्या समोर असणारी तिची सासू किरकोळ जखमी झाली, मयत राधाबाई ही आठ महिन्यांची गर्भवती होती. दुसऱ्या घटनेत केज तालुक्यातील पिट्टीघाट येथील गीता जगन्नाथ ठोंबरे या महिलेचा मृत्यू झाला. गीता शेतात असताना वीज कोसळीयात गीताचा जागीच मृत्यू झाला. Weather Alert: पुण्यासह राज्यात अवकाळी पावसाचं सावट 5 जनावरे दगावली बीड जिल्ह्यातील नेकनूर जवळील सानपवाडीतही वीजेचा कहर पाहावयास मिळाला . सानपवाडी शिवारात वीज पडून बाबासाहेब नामदेव गित्ते यांच्या मालकीचे दोन बैल ठार झाले. तर, अंबाजोगाई शहरातील मेंढी फार्मजवळ चांदमारी परिसरात वीज कोसळून आजीम खान यांच्या मालकीच्या दोन गाई आणि एक शेळी दगावल्याची घटना उघडकीस आली. परभणी दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू परभणी जिल्ह्यातही आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसात वीज कोसळून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. परभणी तालुक्यातील ठोला शिवारात दोन अल्पवयीन मेंढपाळांचा मृत्यू झाला आहे. विठ्ठल आव्हाड (12 वर्षे) आणि वैभव दुगणे (11 वर्षे) अशी मृतकांची नावे आहेत. औरंगाबादमध्ये दोघांचा मृत्यू औरंगाबादमध्येही आज मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातलं. वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जालन्यात शेतकऱ्याचा मृत्यू वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज पडून बदनापूर तालुक्यातील नजीकपंगरी येथील एका शेतकऱ्याचं दुर्दैवी मृत्यू झाला. राधाकिसन जिजा वाघ असं या मयत शेतकऱ्याचं नाव असून पाऊस सुरू झाल्याने शेतातील कांद्यावर ताडपत्री टाकत असताना वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुलढाण्यातही अवकाळी पाऊस बुलढाणा शहरात मुसळधार पावसाला सुरुवात गेल्या अर्धा तासापासून शहराला पावसाने झोडपले अनेक ठिकाणी पडल्यात गारा उकाड्या पासून बुलढाणाकरांना दिलासा मिळाला आहे. परंतु अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने अनेकांची धांदल उडवून दिली. बुलडाणा शहरासह जिल्ह्यात काही ग्रामीण भागात आज पुन्हा अवकाळी पावसाने गारा सह हजेरी लावली त्यामुळे उकळ्या पासून काहीशी सुटका झाली आहे सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणात उष्णता होती त्यात आता पावसाची हजेरी त्यामुळे वातावरण थंड झालं आहे.
First published:

Tags: Maharashtra, Rain

पुढील बातम्या