मुंबई, 03 जून: मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यांनी राज्यातील अनलॉक (Maharashtra Unlock) संदर्भातली मोठी घोषणा केली आहे. पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे. तिथं पूर्णपणे लॉकडाऊन हटवण्यात येईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. अनलॉक, लॉकडाऊन संदर्भात 5 टप्प्यात निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, थिएटर्स, क्रीडा, शूटिंग नियमित निर्णय घेतला आहे. यात सरकारनं सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नाच्या हॉल(wedding ceremony)लाही परवानगी देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेनं व्यवहार सुरु राहतील असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्या थिएटर्स, कार्यालयं, शूटिंग, जिम, सलून सुरु राहतील. त्यात सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमास 50 टक्के परवानगी असेल. लग्न सोहळ्यास हॉलना 50 टक्के आणि जास्तीत जास्त 100 लोकांना उपस्थिती राहण्याची मुभा असेल. अंत्यविधी सोहळ्यास सगळ्यांना उपस्थितीत राहता येईल.
तिसऱ्या टप्प्यात मनोरंजन कार्यक्रमास 50 टक्के सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 पर्यंत खुले असणार. तर लग्नसोहळ्यास 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील.
हेही वाचा- राहुल गांधींनी 'या' 50 जणांना ट्विटरवरुन केलं 'Unfollow', भाजप म्हणते...
राज्य सरकारनं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू केले होते. त्यावेळी राज्य सरकारकडून लग्न समारंभ आणि राजकीय सभा, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले होते. लग्न समारंभास फक्त 25 जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली होती. त्याआधी केवळ 50 जणांना परवानगी होती. ती निम्मी करुन केवळ 25 जणांना लग्न समारंभास मुभा दिली होती. मात्र वडेट्टीवार यांनी केलेल्या घोषणेनंतर आता राज्यात लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमासह 100 टक्के परवानगी असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Maharashtra News