शिवसेनेच्या 5 माजी अनुभवी मंत्र्यांना उद्धव ठाकरेंनी दिला डच्चू

शिवसेनेच्या 5 माजी अनुभवी मंत्र्यांना उद्धव ठाकरेंनी दिला डच्चू

एकूण 36 मंत्र्यांनी सोमवारी शपथ घेतली. शिवसेनेनंच आपल्या 5 माजी अनुभवी मंत्र्यांना डच्चू दिला आहे. गृह, परिवहन, पर्यटन, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती भाजप-सेना सरकारमध्ये सांभाळणाऱ्या माजी मंत्र्यांचाच पत्ता कट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 30 डिसेंबर : अखेर एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ठाकरे सरकारमध्ये तिन्ही पक्षांच्या मिळून 36 मंत्र्यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यामध्ये सत्ताधारी शिवसेनेनंच आपल्या 5 माजी अनुभवी मंत्र्यांना डच्चू दिला आहे. गृह, परिवहन, पर्यटन, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती भाजप-सेना सरकारमध्ये सांभाळणाऱ्या माजी मंत्र्यांचाच पत्ता कट झाल्याने नाराजांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दीपक केसरकर, दिवाकर रावते, रामदास कदम, तानाजी सावंत, आणि रवींद्र वायकर या पाच शिवसेना नेत्यांना आणि माजी मंत्र्यांना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. यामागे गेल्या पाच वर्षातली कामगिरी हे कारण आहेच, पण त्याहीपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध किंवा नाराजी, भाजपशी जवळीक आणि इतर नावांची सरशी ही कारणं असल्याचं बोललं जात आहे. हे पाचही नेते मोठी खाती असणारे अनुभवी नावं होती, तरीही त्यांना मंत्रिपदांपासून दूर ठेवण्यात आलं.

स्थानिक कार्यकर्त्यांची नाराज भोवली?

भाजप- सेना सरकारच्या काळात दीपक केसरकर यांच्याकडे गृहराज्यमंत्रिपद होतं. ते सेनेचे महत्त्वाचे नेते मानले जातात. स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी हे त्यांना डच्चू मिळण्यामागचं कारण मानलं जातं. कोकणात शिवसेनेचा हवा तसा दबदबा कामय ठेवण्यात केसरकर कमी पडल्याचं बोललं जातं. त्यामुळे त्यांना वगळलं असावं.

दिवाकर रावते यांच्याकडे परिवहन खातं होतं. त्यांनी परिवहन मंत्री म्हणून चोख कामगिरी केलेली असली, तरी स्थानिक कार्यकर्ते नाराज होते, असं मानलं जातं. लोकांमधून निवडून आलेले आमदार नाहीत म्हणूनही सेनेनं त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं असावं. या वेळच्या मंत्रिमंडळात विधान परिषदेतल्या आमदारांपेक्षा थेट लोकांमधून निवडून आलेल्या विधानसभा आमदारांना जास्त प्रमाणात स्थान देण्यात आल्याचं दिसतं. रामदार कदम आणि रावते यांचं नाव मागे पडण्यामागे हे कारण असावं.

रामदास कदम यांनाही वगळण्यात आलं आहे. ते माजी पर्यावरण मंत्री होते. स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांच्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लावण्याची आवश्यकता उद्धव ठाकरे यांना जाणवली असावी. म्हणूनच विधानसभेतल्या आमदारांना प्राधान्य देण्यात आलं.

संबंधित - याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारा आमदार ठाकरेंच्या मंत्रिमंडळात

गेल्या पाच वर्षात ज्या नेत्यांनी मतदारसंघात कामं केली, कार्यकर्त्यांची कामं केली त्यांनाच मंत्रिपद द्यावं अशी मागणी पक्षातून होत होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातली नावं ठरवलेली दिसतात.

याचा फटका माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांना बसला. त्यांच्या तक्रारी काही कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. त्यामुळे नाव चर्चेत असलं तरी आयत्या वेळेला वगळून थेट आदित्य ठाकरे यांचंच नाव पुढे आलेलं दिसतं.

संबंधित - मंत्रिमंडळ विस्तारानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, शपथविधीवर म्हणाले...

रवींद्र वायकर यांच्या नावाचीही चर्चा सुरुवातीपासून होती. पण त्यांनाही डच्चू देण्यात आला. रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंच्या मर्जीतलं नाव समजलं जातं, तरीही त्यांना मंत्रिपमंडळापासून दूर ठेवण्यात आलं.

संबंधित - महाआघाडीच्या सरकारमधील 'सोयरीक'; घराणेशाहीतील वारसदारांना मिळाले मंत्रिपद

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सुरुवातीला मुख्यमंत्री वगळता 6 मंत्री होते. त्यांच्यात आज 36 मंत्र्यांची भर पडली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरतं खातेवाटप झालं.

हे आमदार झाले 'मंत्री'...

> अजित पवार यांनी घेतली राज्याच्या उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे घनसावंगी येथील आमदार राजेश टोपे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे अणुशक्तीनगर येथील आमदार नवाब मलिक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंदखेड राजा येथील आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसच्या धारावी येथील आमदार वर्षा गायकवाड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे काटोल मतदार संघाचे आमदार अनिल देशमुख यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

>शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> बच्चू कडू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> डॉ. विश्वजीत कदम यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> दत्तात्रय भरणे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

>राष्ट्रवादीचे नेते संजय बनसोडे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेनेला पाठिंबा देणारे आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

> शंकरराव गडाख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> असलम शेख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेनेचे नेते अॅड. अनिल परब यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> काँग्रेसचे नेते के. सी. पाडवी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीचे नेते सतेज पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेना नेते संदीपान भुमरे यांचा शपथविधी

> जितेंद्र आव्हाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> दादा भुसे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेनेचे यवतमाळ येथील आमदार संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसचे सावनेर येथील आमदार सुनील केदार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

----------------------

संबंधित

धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर परळीतून भावनिक प्रतिक्रिया

देशाचे पहिले CDS होणार लष्करप्रमुख बिपिन रावत, सांभाळणार तिन्ही सैन्याची कमान

...म्हणून संजय राऊत यांनी मारली ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्याला दांडी!

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 30, 2019, 9:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading