गडचिरोलीत दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश

गडचिरोलीत दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश

गडचिरोली जिल्ह्यात माओवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली. यामध्ये दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

  • Share this:

गडचिरोली, 15 सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली. यामध्ये दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. कारेची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात रविवारी (15 सप्टेंबर)पहाटेच्या सुमारास ही चकमक उडाली. नारेकसा जंगल परिसरात सी 60 पथकाचे जवान माओवादविरोधी अभियान राबवत असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. जवानांनी माओवाद्यांचा कॅम्पदेखील उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. एक पुरुष आणि एका महिला माओवाद्याचा मृतांमध्ये समावेश आहे. या चकमकीत पाच माओवादी जखमी झाले आहेत. घटनास्थळी माओवाद्याच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य भास्कर देखील या कॅपमध्ये उपस्थित होता, अशी माहिती समोर आली आहे.  1 मे रोजी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते. या घटनेचा सूत्रधार भास्करच होता.

(वाचा :पाकिस्तानचा खोटेपणा उघड : Airstrike संदर्भात लपवलेल्या सत्याचे हे पुरावे)

दरम्यान, यापूर्वी 6 जुलै रोजी छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मेचका पोलीस ठाणे क्षेत्रातील जंगलात ही चकमक झाली. यामध्ये एक पुरुष आणि तीन महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. चकमकीनंतर जवानांनी 4 मृतदेहांना ताब्यात घेतले.

(वाचा : ...तर मग पाकव्याप्त काश्मीर आम्हाला द्या, रामदास आठवलेंनी पाकिस्तानला ठणकावलं)

घटनास्थळावरून जवानांनी नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला. डीआयजी नक्शल ऑपरेशन सुंदरराज पी यांनी या चकमकीची माहिती दिली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षारक्षकांचं हे मोठं ऑपरेशन मानलं जातं.

(वाचा :भारतानं मारले पाकचे सैनिक, मृतदेह नेण्यासाठी केली धावाधाव; पाहा VIDEO)

VIDEO: अनधिकृत होर्डिंग्ज पुणेकरांना मनस्ताप; वाहतूक कोंडीत अ‍ॅम्ब्युलन्स अडकली

First published: September 15, 2019, 10:56 AM IST

ताज्या बातम्या