चिंता वाढली! राज्यात शनिवारी कोरोनामुळे 36 रुग्णांचा मृत्यू तर रुग्णांचा आकडा 12296 वर 

चिंता वाढली! राज्यात शनिवारी कोरोनामुळे 36 रुग्णांचा मृत्यू तर रुग्णांचा आकडा 12296 वर 

लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असतानाही कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने चिंता वाढली आहे.

  • Share this:

मुंबई, 2 मे: राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कठोर करण्यात आलं असतानाही कोरोनाबाधिताची संख्या नियंत्रणात येत नसल्याने चिंता वाढली आहे. धक्कादायक म्हणजे राज्यात शनिवारी 36 रुग्णांचा मृत्यू झाला असून 790 एकूण नवीन रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे.   तसेच राज्यात आत्तापर्यंत दोन हजार रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.

मुंबईत 27, पुण्यात 3, अमरावतीत 3, वसई-विरार 1, औरंगाबाद-1 मृत्यू झाला आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील एकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये 28 पुरुष तर 8 महिला आहेत. कोरोनामुळे राज्यात मृतांची एकूण संख्या 521 वर पोहोचली आहे.

दरम्यान, राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यानं प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा.. Lockdown मध्ये लपून भेटणं महागात पडलं, गावकऱ्यांनी थेट बोहल्यावर चढवलं

दुसरीकडे, मुंबईत आज 547 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोणाच्या एकूण रुग्णांची संख्या 8172 वर पहोचली आहे. आज कोरोणामुळे 27 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 322 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 137 जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 1708 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

पुण्यात दिवसभरात 107 पॉझिटिव्ह रुग्ण आढळली असून चार करोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू आहे. डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 413 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेले 53 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 67 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 11 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, पुण्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1718 आहेत. आतापर्यंत एकूण 95 जण कोरोनामुळे दगावली आहेत.

दरम्यान, जगातल्या इतर देशांपेक्षा भारतात कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात असला तरी संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोबाधितांची संख्या आता 37776 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 1223वर गेला आहे. जगात आत्तापर्यंत 32 लाख लोक बाधित असून 2 लाख 28 हजार जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोना व्हायरसचं ‘म्युटेशन’ झालं आहे का याचा अभ्यास ICMR चे संशोधक करत आहेत.

हेही वाचा.. Coronavirus: गुड न्यूज! पिंपरी चिंचवडमध्ये 7 बालकांनी कोरोनावर केली मात

मुंबईत 15 दिवसांमध्ये उभं राहणार 1000 खाटांचं COVID-19 हॉस्पिटल!

कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनने ज्या प्रकारे वुहान शहारात 1000 खाटांचे कोविड19 हॉस्पिटल युद्धपातळीवर उभारले तसेच महाराष्ट्र सरकार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात 1000 खाटांचे कोविड19 हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. हे हॉस्पिटल ऑक्सिजन आणि मॉनिटर यंत्रणांनी सुसज्ज असणार आहे. पुढील 15 दिवसांत हे हॉस्पिटल युद्धपातळीवर उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून नगरविकस मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी विशेष टीम तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरवातही केली आहे. हे हॉस्पिटल हे तात्पुरतं असणार आहे.

याच युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामाची पहाणी करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली. ठाणे येथील ज्युपीटर हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली आणि एमएमआरडीए संयुक्तपणे या 1000 खाटांच्या हॉस्पिटलची निर्मिती करत आहे.

MMRDA ज्युपिटर हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली हे 1000 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभे करीत आहे. अंदाजे 15 दिवसांत हे रुग्णालय उभे राहणार आहे, त्यापैकी काही भाग हा येत्या 8 दिवसांत सुरू करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

First published: May 2, 2020, 8:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading