Home /News /maharashtra /

राज्यात या 2 दिवशी होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

राज्यात या 2 दिवशी होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

    मुंबई, 16 ऑगस्ट : राज्यात गेल्या दोन आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम आहे. पुढचे आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, घाट माथा तसंच तळ कोकणात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यातही काही भागात पावसाचा जोर असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन कधी उघडणार? मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे. राज्यातील पाऊसमान - गेल्या 15 दिवसात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस - नगर, औरंगाबाद, सोलापूर, बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस - तर नंदूरबार, अकोला, यवतमाळ, अमरावती, गोंदियात माञ सरासरी पेक्षा कमी पाऊस - पण 13 ते 17 ऑगस्टपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज गर्लफ्रेंड गर्भवती राहिल्यानंतर शरीर संबंधावरुन झाला वाद, पुण्यात हत्येचा घडला भयंकर प्रकार या दुसऱ्या स्पेलमध्ये विशेषत: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेचे संशोधक डॉ. अनुमप कश्यपी यांनी व्यक्त केला आहे. कृष्णा-भीमा खोऱ्यातली धरणंही आता भरू लागली आहेत. कृष्णा खोऱ्यातील धरणं 75 टक्के तर भिमा खोऱ्यातील धरणं 65 टक्के भरलीत. तसंच जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात ऑगस्टमधील मोठ्या पुराचा धोकाही काही प्रमाणात टळला आहे आणि वरून सध्याच्या पावसाने बहुतांश धरणंही भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Todays weather

    पुढील बातम्या