मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने; आज 54,535 रुग्ण कोरोनामुक्त तर रिकव्हरी रेट 88.34%

राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने; आज 54,535 रुग्ण कोरोनामुक्त तर रिकव्हरी रेट 88.34%

महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे

महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे

महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 13 मे: राज्यातील कोरोनाचा (Coronavirus) विळखा आणखी सैल होताना दिसत आहे. आजही राज्यातील (Maharashtra) कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही बाधितांपेक्षा अधिक आहे. आज राज्यात एकूण 54,535 रुग्णांनी कोरोनावर मात (54,535 patients discharged today) केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 46,54,731 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.34 टक्के इतके झाले आहे.

आज राज्यात 42,582 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,03,51,356 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52,69,292 म्हणजेच 17.36 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 35,02,630 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,847 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण कुठल्या जिल्ह्यात?

राज्यात आजच्या तारखेला एकूण 5,33,294 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 101181 सक्रिय रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात 45,996 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 36,338 सक्रिय रुग्ण आहेत तर ठाण्यात 30,922 सक्रिय रुग्ण आहेत.

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई६८३१८५६३०९००१४०४०१९०७३६३३८
ठाणे५४४४९३५०५९६५७५७५३१३०९२२
पालघर१०५५१५८९४५५१२९४१२१४७५४
रायगड१३६३८९१२५२१९२३८४८७८४
रत्नागिरी३३२२६२१९६२६४३१०६१९
सिंधुदुर्ग१८८६६१३८८३४५०४५२९
पुणे९५६९३८८४५४६७१०२३२५८१०११८१
सातारा१३०६०६१०४४०२२५४५१२२३६४७
सांगली१०१२५९७८९५७२३२९१९९७१
१०कोल्हापूर८५९७९६४०१७२०४७१९९१२
११सोलापूर१३३४४३१०९०५०३१००६०२१२३३
१२नाशिक३६०५७३३४०००९३९४६१६६१७
१३अहमदनगर२१४९५७१८३७०४२३९०२८८६२
१४जळगाव१३००८०११६९९७२१४०३२१०९११
१५नंदूरबार३७४९२३४३६६७०४२४२०
१६धुळे४१५३३३७६७९४९४१२३३४८
१७औरंगाबाद१३७४८७१२६४३८२१९६१४८८३९
१८जालना५२५४९४४८५१८१६६८८१
१९बीड७२३९३५२५८५१३००१८४९९
२०लातूर८३५४८७२४०२१४३०९७१२
२१परभणी४५५७९३८३०९७४६११६५१३
२२हिंगोली१६०४८१४१२८२४११६७९
२३नांदेड८७३०२८०५०६१९२०४८६८
२४उस्मानाबाद४७९८७४०२४०११४५४९६५५३
२५अमरावती७५६२६६३५६२११२५१०९३७
२६अकोला४७७३३४१६१४७४८५३६७
२७वाशिम३३२६०२८९२४४२०३९१३
२८बुलढाणा६६१६०५८९४१४२७६७८७
२९यवतमाळ६३०८४५५६२१११७०६२८९
३०नागपूर४७४०३८४२२१६४५८३२४६४५९९६
३१वर्धा५२३९६४४२२८७०८८३७३७७
३२भंडारा५७२०३५१६७२५९०४९३४
३३गोंदिया३८३१३३३५०७३९६४४०४
३४चंद्रपूर७८५६७६१२४८९५०१६३६७
३५गडचिरोली२५३३९२१७५९२६६३३०५
इतर राज्ये/ देश१४६११८२६
एकूण५२६९२९२४६५४७३१७८८५७२४१०५३३२९४

वाचा: COVISHIELD कोरोना लशीच्या 2 डोसमधील अंतर वाढलं; आता इतक्या दिवसांनंतर घ्यावा लागणार दुसरा डोस

आज कुठल्या विभागात किती रुग्णांचे निदान?

ठाणे - 5953

नाशिक - 6506

पुणे - 12619

कोल्हापूर - 4467

औरंगाबाद - 1870

लातूर - 2459

अकोला - 4056

नागपूर - 4652

एकूण - 42,582

राज्यात आज 850 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.5 टक्के इतका आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी 409 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत तर 160 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 281 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Covid19, Maharashtra