• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Maharashtra Weather Alert: या जिल्ह्यांत पुन्हा अवकाळी पाऊस; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता

Maharashtra Weather Alert: या जिल्ह्यांत पुन्हा अवकाळी पाऊस; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता

Maharashtra weather report: राज्यातील काही भागांत पुढील तीन-चार दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 एप्रिल: महाराष्ट्रातील तापमानात दिवसेंदिवस बदल होताना दिसत आहेत. राज्यातील विविध भागांत तापमानात वाढ झाल्याने उष्णतेची (Heat wave) लाट येत आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर आता राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), मराठवाडासह (Marathwada) विदर्भातील (Vidarbha) काही भागांत विजांच्या कडकडाट होण्याचा अंदाज (possibility of thunderstorms with lightnings) हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भाच्या तुरळक भागात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मात्र, आता हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या के. एस. होसळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली की, येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. बळीराजाची चिंता वाढली काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागांत काही दिवसांपूर्वी तापमानात घट होऊन अवकाळी पाऊस पडला होता. अवगकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने बळीराज्याची चिंता आणखी वाढली आहे. पुढील हवामानाचा अंदाज 8 एप्रिल : कोकण : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र : हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा : हवामान कोरडे राहण्याची शक्यता. विदर्भ : हवामान कोरडे राहण्याची शक्यता. 9 एप्रिल : कोकण : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भ : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भात उन्हाची दहशत कायम! उद्या उष्णतेची लाट धडकणार, तर पुण्यातही पारा चढाच 10 एप्रिल: कोकण : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ : तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. 11 एप्रिल : कोकण : तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र : दक्षिण मध्ये महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा : तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ : तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
  Published by:Sunil Desale
  First published: