सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 'ती'चं डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं

सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 'ती'चं डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं

  • Share this:

हिंगोली, 3 मे : घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिंगोलीतील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील ही घटना आहे.

(2 मे) मध्यरात्री झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये दळवी कुटुंबीयांचं संपूर्ण घरच जळून खाक झालं. सोनाजी दळवी, सुरेखा दळवी, पूजा दळवी अशी मृतांची नावं आहेत. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला, यामध्ये संपूर्ण कुटुंबीयांचा जागीच मृत्यू झाला.

दळवी दाम्पत्याची मुलगी पूजा ही बीएचएमएसचं शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना एवढी भीषण होती की, सिलिंडरच्या स्फोटामध्ये संपूर्ण घरच उद्ध्वस्त झालं आहे.

या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

वाचा अन्य बातम्या

कम्पाउंडरचा 'हा' मुलगा एका रात्रीत झाला कोट्यधीश, गाजवतोय सध्या IPL

...आणि लग्नपत्रिकेमध्ये सुजय विखे झाले खासदार

वादळी पाऊसवाऱ्यासहीत फानी चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं

SPECIAL REPORT : कार्यकर्त्यांनो असं करा चवदार राजकारण, नाशिकची अशीही 'मिसळ'!

First published: May 3, 2019, 9:07 AM IST

ताज्या बातम्या