काळाचा घाला ! ट्रकच्या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू

काळाचा घाला ! ट्रकच्या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू

ट्रक आणि बोलेरो जीपच्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

  • Share this:

अहमदनगर, 26 मे : ट्रक आणि बोलेरो जीपच्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. राहुरी शहराजवळची ही घटना आहे. अहमदनगर-मनमाड महामार्गावर शिंगणापूर फाटा येथे झालेल्या या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक बराच काळ थांबवण्यात आली होती.

बोलेरो जीप पुण्याकडे जात असताना दुभाजक ओलांडून थेट दुसऱ्या मार्गावर फेकली गेली. यावेळेस ही जीप समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकली. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर तिघांनाही नगरच्या हॉस्पिटलमध्ये नेलं जात असताना त्यांनी आपले प्राण सोडले.

पाहा :VIDEO : घरात सून कशी असावी? शरद पवारांचे अनुभवाचे बोल

बोलोरो गाडीतील सर्वजण पुणे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमींना तातडीनं रूग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेनंतर नगर-मनमाड महामार्ग काही काळासाठी ठप्प झाला होता. या ठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगादेखील लागल्या होत्या.

VIDEO : स्मृती इराणींना अश्रू अनावर, कार्यकर्त्याच्या पार्थिवाला दिला खांदा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 08:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading