मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'लाल परी' आर्थिक संकटातून बाहेर येणार; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

'लाल परी' आर्थिक संकटातून बाहेर येणार; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली.

एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली.

एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली.

मुंबई, 9 जून: महाराष्ट्राची लाल परी अर्थात एसटी (ST) गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात सापडल्याचं पहायला मिळत आहे. याच एसटी महामंडळाला (ST Mahamandal) आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला 600 कोटी रुपयांची आर्थिक मदत (600 crore rupees help) देण्याचं जाहीर केलं आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब (Anil Parab) यांनी दिली.

कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊन यामुळे एसटीची वाहतूक सुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू नव्हती. त्यानंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन लागू झाला. आता कुठे पुन्हा 50 टक्के आसन क्षमतेने वाहतूक सुरू झाली आहे. या सर्वांचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचाही प्रश्न समोर आला. आता राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्याने एसटीच्या 98 हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणं शक्य होणार आहे.

एसटी महामंडळाकडून काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीसाठी एक प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्चासाठी 600 कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं.

कोरोना जाण्याची वाट पाहताय का, 'सर्जिकल स्ट्राईक' करा, कोर्टाने मोदी सरकारला फटकारले

यापूर्वी देखील परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडुन तब्बल1 हजार कोटी रुपये एसटी महामंडळाला मिळवुन दिले. त्यातून गेल्या सहा महिन्यांमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देणे शक्य झाले. एसटी महामंडळाकडून आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.

एसटीच्या मालवाहतूकीला सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध 17 विभागांच्या एकूण मालवाहतूकी पैकी 25 % मालवाहतूक एसटीच्या "महाकार्गो" ला मिळाली

सामान्य माणसांना पेट्रोल-डिझेल अथवा सीएनजी पेट्रोल पंप एसटी महामंडळातर्फे सुरू करण्यात येणार आहेत. विविध पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकृत विक्रेते म्हणून एसटी महामंडळ या व्यवसायात उतरत असून,या व्यवसायातून एक शाश्वत

उत्पन्नाचा स्त्रोत एसटी महामंडळाला निर्माण झाला

शासनाच्या विविध विभागांच्या वाहनांची तांत्रिक देखभाल करणे

प्रवाशांना "नाथजल" च्या माध्यमातून शुद्ध बाटलीबंद पाणी देण्याची योजना

First published:

Tags: Maharashtra, St bus, Uddhav thackeray