Home /News /maharashtra /

तांत्रिक त्रृटीमुळे महाराष्ट्रातील 'हा' जिल्हा कोरोनामुक्त

तांत्रिक त्रृटीमुळे महाराष्ट्रातील 'हा' जिल्हा कोरोनामुक्त

Maharashtra Coronavirus updates: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण होत असताना आता एक जिल्हा कोरोनामुक्त सुद्धा झाला आहे.

    मुंबई, 13 जून: महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण (Covid cases decrease in Maharashtra) होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंधही शिथिल केले आहेत. याच दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे राज्यातील एक जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याची. होय, कारण या जिल्ह्यात आता सक्रिय रुग्ण (Active cases Zero) संख्या ही शून्य झाली असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, आता यासंदर्भात आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधित आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकार दररोज आकडेवारी जाहीर करत असते. आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय रुग्ण संख्या ही शून्य (Buldhana District covid active cases zero) झाली आहे. मात्र, आज जिल्ह्यात नव्याने 69 रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांची नोंद सक्रिय रुग्णसंख्येत झालेली नाहीये तांत्रिक तृटीमुळे हा घोळ झाला असल्याची माहिती डॉ. प्रदीप आवटे यांनी न्यूज18 लोकमतच्या डिजिटलला दिली. सध्या स्थितीत आता बुलडाणा जिल्ह्यात 69 सक्रिय रुग्ण आहेत. आकडेवारीनुसार, बुलडाणा जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 82,101 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यापैकी 81461 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 635 रुग्णांचा कोरोनामुळे तर पाच जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आज एकूण 7504 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 56,39,271 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.44 टक्के इतके आहे. आज राज्यात 10,442 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 483 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 284 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 199 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
    First published:

    Tags: Buldhana news, Coronavirus, Covid-19

    पुढील बातम्या