मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ST employee suicide: पंढरपुरात एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या

ST employee suicide: पंढरपुरात एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या

ST employee suicide: पंढरपुरात एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या

ST employee suicide: पंढरपुरात एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या

ST employee suicide in Pandharpur: आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने आपल्या आयुष्याचा शेवट केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पंढरपूर, 13 ऑक्टोबर : पंढरपूर (Pandharpur) येथील एसटी आगारातील दशरथ गिड्डे (ST Employee Dashrath Gidde) या कर्मचाऱ्याने राहत्या घरी आज पहाटे गळफास लावून आत्महत्या (ST employee suicide) केली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाहीये. दशरथ गिड्डे हे पंढरपूर येथील एसटी आगारात यांत्रिकी विभागात गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते. आज पहाटे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.

दशरथ गिड्डे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. मूळचे मोहोळ येथील असलेले गिड्डे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावामध्ये होते. त्यातूनच त्यांनी ही आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत. त्यातूनच अनेक ठिकाणी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. अशातच आज पंढरपुरातील यांत्रिक विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एसटी विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

गेल्या महिन्यात संगमनेरमधील एसटी चालकाची आत्महत्या

अहमदनगरमधील संगमनेर बस डेपोमध्ये (Sangamner bus depot)सप्टेंबर महिन्यात हा प्रकार घडला. या घटनेने एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली. मृतक बस चालकाचे नाव सुभाष तेलोरे असे होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी बसचे चालक सुभाष तेलोरे यांनी अहमदनगरमधली संगमनेर बस डेपो येथे एसटी बसमध्येच गळफास घेत आयुष्य संपवलं. पहाटेच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला. पाथर्डी - नाशिक या बसचे ते चालक होते. संगमनेर बसस्थानकात डिझेल नसल्यानं नाशिकला न जाता संगमनेरला बस मुक्कामी होती. त्यावेळी पहाटेच्या सुमारास त्यांनी कपड्याच्या सहाय्याने बसमध्ये गळफास घेतला.

एसटी चालक सुभाष तेलोरे हे पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गावातील निवासी असून ते एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर कर्ज होते आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याने त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

धुळ्यातील ST कर्मचाऱ्याची आत्महत्या

ऑगस्ट महिन्यात धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. एसटी चालक कमलेश बेडसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली होती. अनियमित पगारामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलनही केलं होतं.

First published:

Tags: Pandharpur, ST, Suicide