Home /News /maharashtra /

Water Crisis : यंदा लवकर पाऊस न झाल्यास राज्यात दुष्काळाची परिस्थिती धरणांमध्ये फक्त एवढा पाणीसाठा शिल्लक

Water Crisis : यंदा लवकर पाऊस न झाल्यास राज्यात दुष्काळाची परिस्थिती धरणांमध्ये फक्त एवढा पाणीसाठा शिल्लक

राज्यात यंदा पावसाने हुलकावणी दिली तर दुष्काळाची परिस्थिती होण्याची शक्यता आहे. (Water Crisis) दरम्यान नाशिकमध्ये सध्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

  मुंबई, 26 मे : राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात (Irrigation project) 25 मे अखेर 36.68 टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या याच काळात हे प्रमाण 36.27 टक्के एवढे होते. तसेच राज्यातील टंचाईग्रस्त भागात 401 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान राज्यात यंदा पावसाने हुलकावणी दिली तर दुष्काळाची परिस्थिती होण्याची शक्यता आहे. (Water Crisis) दरम्यान नाशिकमध्ये सध्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे.

  राज्यातील उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठ्यासाठी शासन जलसाठयाचे नियोजन करत आहे. यासाठी वेळोवळी जलसाठ्याचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपायोजना राबविण्यात येत आहेत. सध्या राज्यात धरणातील जलसाठ्याचा विचार करता अमरावती विभागात 1924 दशलक्ष घनमीटर म्हणजे विभागाच्या एकूण साठ्याच्या 47.22 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

  हे ही वाचा :  Sugar Factory : मराठवाड्यात अद्यापही 50 टक्के साखर कारखाने सुरू, ऊस वाळत चालल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

  त्यापाठोपाठ मराठवाडा विभागात 3 हजार 327 दलघमी म्हणजे 45.13 टक्के, कोकण विभागात 1567 दलघमी म्हणजे 44.65 टक्के, नागपूर विभागात 1620 दलघमी म्हणजे 35.18 टक्के, नाशिक ‍विभागात 2138 दलघमी म्हणजे 35.62 टक्के तर पुणे विभागात 4381 दलघमी म्हणजे 28.8 टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे.

  तसेच टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. याअंतर्गत टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना आवश्यकतेनुसार टँकर्सद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यात कोकण विभागात 155 गावांना आणि 499 वाड्यांना 101 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

  हे ही वाचा : Pune murder: लग्नानंतरच्या फोन कॉल्सने घेतला कारागृह अधीक्षकांच्या मुलाचा जीव, धक्कादायक माहिती उघड

  नाशिक विभागात 117 गावे, 199 वाड्यांना 102 टँकर्स, पुणे विभागात 71 गावे आणि 360 वाड्यांना 70 टँकर्स, औरंगाबाद विभागात 43 गावे, 23 वाड्यांना 59 टँकर्स, अमरावती विभागात 69 गावांना 69 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागात मे महिन्याअखेरीस देखील टँकर्सची आवश्यकता भासलेली नाही.

  गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टँकरग्रस्त गावांमध्ये 53ने आणि वाड्यांमध्ये 116 ने वाढ झालेली आहे. तसेच टँकर्समध्ये 46 ने वाढ झालेली आहे. राज्यात पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण 401 टँकर्समध्ये 89 शासकीय आणि 312 खाजगी टँकर्सचा समावेश आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Water crisis, Watersupply पाणीपुरवठा

  पुढील बातम्या