Home /News /maharashtra /

राष्ट्रवादीत नवे Vs जुने संघर्ष, खातेवाटपात पवारांची 'पॉवर' कुणाच्या बाजूने?

राष्ट्रवादीत नवे Vs जुने संघर्ष, खातेवाटपात पवारांची 'पॉवर' कुणाच्या बाजूने?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे.

    सागर कुलकर्णी, मुंबई, 2 जानेवारी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरीही खातेवाटपावरून पक्षांतर्गत कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. खातेवाटप आणि पालकमंत्रिपदाचा तोडगा काल (बुधवारी) निघाला नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे. शिवसेनेकडून चांगलं खातं मिळावं याासाठी काँग्रेस आग्रही आहे. पण त्याचवेळी काँग्रेस पक्षातही महसूल खात्या यासाठी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. सत्तेत सहभागी असलेल्या तिनही पक्षांच्या नेत्यांमध्ये खातेवाटपावरून काल तब्बल 4 तास खलबतं झाली. मात्र या चर्चेतून अंतिम तोडगा निघू शकला नाही. राष्ट्रवादीतही मंत्रिपदावरून धुमशान, जुने विरुद्ध नवे संघर्ष? एकीकडे काँग्रेस पक्षात चांगल्या खातं मिळावं यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू असताना राष्ट्रवादीतही गृह आणि इतर महत्त्वाच्या खात्यांसाठी स्पर्धा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृह खातं विदर्भातील नेते अनिल देशमुख यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. भास्कर जाधवांना पुन्हा धक्का, शिवसेनेनं खोडून काढला दावा त्यामुळे पक्षातील इतर प्रस्थापित नेत्यांना धक्का बसला आहे. विदर्भात पक्षाचा विस्तार करण्यासाठी गृहखातं अनिल देशमुख यांना देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र शरद पवार यांच्या या निर्णयामुळे गृहखात्यासाठी आग्रही असलेल्या जयंत पाटील, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांना धक्का बसला आहे. शिवसेनेत नंबर दोन कोण? शिवसेनेच्या वाट्याला आलेले नगरविकास खाते तुर्तास एकनाथ शिंदे यांना मिळाले असले तरीही या खात्यासाठी सुभाष देसाई, उदय सामंत हे नेतेही आग्रही आहेत. शिवसेनेतून कॅबिनेट मंत्री झालेले अनिल परब, संजय राठोड, अपक्ष गडाख यांचेही चांगले खाते मिळावे यासाठी प्रयत्न चालले आहेत. त्यातच पालकमंत्रिपदावरून तीन पक्षात काही जिल्ह्यांमध्ये रस्सीखेच आहे. मुंबई शहर आणि उपनगर, रायगड, नाशिक, नागपूर येथे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील मंत्री पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आगामी काळात याबाबत काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: NCP, Sharad pawar

    पुढील बातम्या