नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दीड लाख कर्मचारी जाणार रजेवर!

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दीड लाख कर्मचारी जाणार रजेवर!

'राज्य सरकारचे दीड लाख कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी एक दिवसाच्या सामुहिक रजेवर जाणार आहेत.'

  • Share this:

मुंबई, 25 डिसेंबर : निवडणुका जवळ आल्या की सर्वच संघटानांच्या आंदोलानांना जोर चढतो. निवडणुकीच्या तोंडावर सरकारवर दबाव आणून मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. असाच इशारा आता कर्मचारी संघटनांनी दिला आहे. महाराष्ट्रतील सर्व खात्यातील अधिकारी  5 जानेवारीला जानेवारीला सामुदायिक रजेवर जाणार आहेत.

नवीन वर्षापासून सातवा वेतन आयोग लागू व्हावा, केंद्र सरकारप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा असावा आणि सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवून 60 वर्षं करण्यात यावी या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. तसंच  रिक्त पदं तातडीनं भरण्यात यावीत अशी मागणीही  महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघाने केली आहे.

सातवा वेतन आयोग लागू करण्याची कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे. सरकारने होकार दिला असला तरी त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी नाराज आहेत.

1 जानेवारी पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे, अशी घोषणा वित्तमंत्री दीपक केसरकर यांनी 30 नोव्हेंबरला केली होती.

सातवा वेतन आयोग करण्यात यावा, अशी आग्रही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. त्यामुळं हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत दीपक केसरकर यांनी याबाबतची घोषणा केली.

दरम्यान, सातवा वेतन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी काही दिवसांपूर्वी संपावर गेले होते. त्याचे तीव्र पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. या संपाच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात मोठी खडाजंगी रंगली होती.

संपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना संप करणाऱ्यांवर कारवाई करणार अशी भूमिका दिवाकर यांनी घेतली तर आपल्या मागण्य़ांसाठी संप करणं हा त्यांचा हक्क असल्याची भूमिका विनोद तावडे यांनी घेतली. याच्यावर या दोघांमघ्ये खडाजंगी झाली होती.

सरकारी कर्मचारी संघटनेत 5 लाख सरकारी, अडीच लाख जिल्हा परिषद, 7 लाख शिक्षक, नगर पालिका आणि महापालिका असे एकूण 17 लाख कर्मचारी संपावर गेले होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2018 03:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading