'या' तीन कारणामुळे रखडलं होतं ठाकरे सरकारचं खातेवाटप, वाचा INSIDE STORY

'या' तीन कारणामुळे रखडलं होतं ठाकरे सरकारचं खातेवाटप, वाचा INSIDE STORY

महाआघाडीत तीन खात्यावरून अद्याप निर्णय अडचणीत आहे. गृह, नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यावरून एनसीपी आणि सेना यांच्यात मतभेद असल्याचं समोर येत आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : राज्यात भलं मोठ सत्तानाट्य झाल्यानंतर अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन वेगळ्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येत राज्यात ऐतिहासिक महाविकासआघाडीची सत्ता आणली. पण असं असतानादेखील 13 दिवस झाले तरी खातेवाटप रखडलेलं आहे. महत्त्वाच्या खात्यांवरून खातेवाटप अडलं असल्याची राजकीय चर्चा सध्या सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाआघाडीत तीन खात्यावरून अद्याप निर्णय अडचणीत आहे. गृह, नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यावरून एनसीपी आणि सेना यांच्यात मतभेद असल्याचं समोर येत आहे.  लवकरच खातेवाटप होणार असून याबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले होते. तीनही पक्ष एका विचाराने एकत्र आले असून आमच्यात कोणताही वाद नसल्याचेही बाळासाहेब थोरात स्पष्ट केले होतं. त्यानंतर आता आज संध्याकाळपर्यंत चर्चा संपून खातेवाटप होईल अशी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना आशा आहे. त्यामुळे सत्तेचा तिढा सुटण्यात यश आलं तसं आता खातेवाटपाचं गणित महाविकासआघाडीला सोडवता येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या - एकनाथ खडसेंना भेटणारच, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने भाजपची चिंता वाढली

दरम्यान, खातेवाटपावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांआधी बैठक पार पडली होतीयात सगळ्यांचं लक्ष लागलेल्या गृहविभागाविषयी महत्त्वाचा निर्णय झाला असल्याची माहितीही समोर आली होती. हा विभाग तुर्तास शिवसेनेकडेच राहणार आहे. गृहविभाग आपल्याकडेच असावा असा राष्ट्रवादीचा आग्रह होता. हे खातं अजित पवारांना पाहिजे असल्याचंही बोललं जातं होतं. मात्र यावर पक्षात नाराजी निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे खातं सध्या शिवसेनेकडेच राहणार असल्याची माहिती आहे. असं झालं तर तो अजित पवारांना धक्का असेल असंही मानलं जातं.

महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अजूनही मंत्र्यांचा खातेवाटप झालेला नाही. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत 6 मंत्र्यांना तुर्तास खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

इतर बातम्या - 'भारताचा प्रवास 'मेक इन इंडिया' पासून 'रेप इन इंडिया'पर्यंत'

महाविकासआघाडीचा खातेवाटपाचा तिढा सुटला? या तारखेला मंत्र्याचा शपथविधी

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन 13 दिवस झाले मात्र अजुनही खातेवाटप जाहीर केलं नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचं बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली. मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये ही चर्चा झाली. या चर्चेत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि अजित पवार सहभागी झाले तर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे सहभागी झाले. यावेळी, खातेवाटपामध्ये फार दिरंगाई नको, खातेवाटप लवकर जाहीर करावे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

इतर बातम्या - उद्धव ठाकरे अजूनही पक्षप्रमुखासारखेच वागतात, मनसेचा गंभीर आरोप

Published by: Renuka Dhaybar
First published: December 10, 2019, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading