#BREAKING शिवसेना आणि भाजपच्या दोन आमदारांमध्ये हाणामारी, अधिवेशनाला वादळी वळण

#BREAKING शिवसेना आणि भाजपच्या दोन आमदारांमध्ये हाणामारी, अधिवेशनाला वादळी वळण

शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये थेट हाणामारी झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 डिसेंबर : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.

सभागृहात दोन आमदारांमध्ये थेट हाणामारी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर सत्तारूढ पक्षाकडून जयंत पाटील आणि भास्कर जाधव आमदारांना समजावत आहेत. तर भाजपकडून आशिष शेलार आणि गिरीश महाजन हे भाजप आमदारांना आवरण्याचा प्रयत्न करत आहेत.

सभागृहात मोठा गोंधळ

शेतकऱ्यांना 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्या - देवेंद्र फडणवीस

तोपर्यंतच कामकाज करू नका - फडणवीस

कामकाज चालू द्यायचं नसेल तर सांगा - विधानसभा अध्यक्ष

- विरोधकांचा विधानसभेत गोंधळ

- सर्व विरोधक वेलमध्ये उतरले

- बॅनर फडकवला तर कारवाई करेन - अध्यक्ष

- बॅनर फडकवणाऱ्या आमदारांची नोंद

- सभागृह कामकाज अर्धा तासासाठी तहकूब

- आज आमदारांचा निलंबन होण्याची चिन्ह

अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. विधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल सभागृहात मोठा गदारोळ झाला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून भाजपने सरकारवर आक्रमक टीका केली. तसंच यावेळी भाजपच्या काही आमदारांनी थेट सभागृहात बॅनरबाजी केली. मात्र ही बॅनरबाजी आता भाजप आमदारांना भोवण्याची शक्यता आहे.

भाजपच्या काही आमदारांनी आमदारांनी सावरकरांसंबंधित बॅनर्स सभागृहात आणले होते. सभागृहात अशा प्रकारे बॅनरबाजी करण्यास परवानगी नसते. असं असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात बॅनर झळकावल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अशा आमदारांचं विधानसभा अध्यक्ष निलंबनही करू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2019 11:21 AM IST

ताज्या बातम्या