मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 3202 वर, 300 रुग्ण बरे होऊन गेले घरी

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 3202 वर, 300 रुग्ण बरे होऊन गेले घरी

राज्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे 3, पुण्यातील 4 आहेत.

राज्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे 3, पुण्यातील 4 आहेत.

राज्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे 3, पुण्यातील 4 आहेत.

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई, 16 एप्रिल: राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गुरुवारी कोरोनाबाधित 286 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्ण संख्या 3202 झाली आहे. दिवसभरात 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 300 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे 3, पुण्यातील 4 आहेत. त्यापैकी 5 पुरुष तर 2 महिला आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 194 झाली आहे.  मृत्यूमुखी पडलेल्या 7 जणांपैकी 6 रुग्णांमध्ये ( 86 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

हेही वाचा...कोरोनाच्या संकटात दिसला दानशूर महाराष्ट्राचा चेहरा; 15 दिवसात जमले 245 कोटी

प्रयोगशाळेत आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 56 हजार 673 नमुन्यांपैकी 52 हजार 762 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 3202 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 71,076 लोक होमक्वारंटाईनमध्ये असून 6108 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्र राज्यात कोरोना मुळे होणाऱ्यां मृत्यूचा दर हा देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. या मृत्यूंची कारणमीमांसा आणि उपाययोजना करण्यासाठी तसेच जिल्हा पातळीवर रुग्णोपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावर तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष दल (टास्क फोर्स ) स्थापन करण्यात आले आहे. यामुळे राज्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक हॉटलाईन उपलब्ध होणार आहे.

या टास्क फोर्स मधील तज्ञ डॉक्टरांना सोमवार ते रविवार असे दिवस वाटप करण्यात आले असून या टास्क फोर्समध्ये शासकीय तसेच खाजगी आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे. डॉ. झहीर उदवाडिया , डॉ. नितीन कर्णिक, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. केदार तोरस्कर, डॉ. ओम श्रीवास्तव , डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडीत या तज्ञांचा या टास्क फोर्समध्ये समावेश आहे.

हेही वाचा..कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर अंत्यसंस्काराला विरोध

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 297 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 5664 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 20.50 लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील...

मुंबई महानगरपालिका: 2073

ठाणे: 13

ठाणे मनपा: 109

नवी मुंबई मनपा: 68

कल्याण- डोंबवली मनपा: 52

उल्हासनगर मनपा: 1

भिवंडी निजामपूर मनपा: 1

मीरा भाईंदर मनपा: 51

पालघर: 5

वसई विरार मनपा: 34

रायगड: 6

पनवेल मनपा: 12

ठाणे मंडळ एकूण: 2423

नाशिक: 3

नाशिक मनपा: 5

मालेगाव मनपा: 40

अहमदनगर: 19

अहमदनगर मनपा: 9

धुळे: 1

धुळे मनपा: 0

जळगाव: 0

जळगाव मनपा: 2

नंदूरबार: 0

नाशिक मंडळ एकूण: 79

पुणे: 16

पुणे मनपा: 419

पिंपरी चिंचवड मनपा: 38

सोलापूर: 0

सोलापूर मनपा: 12

सातारा: 7

पुणे मंडळ एकूण: 492

कोल्हापूर: 3

कोल्हापूर मनपा: 3

सांगली: 26

सांगली मिरज कुपवाड मनपा:0

सिंधुदुर्ग: 1

रत्नागिरी: 6

कोल्हापूर मंडळ एकूण: 39

औरंगाबाद:0

औरंगाबाद मनपा: 28

जालना: 2

हिंगोली: 1

परभणी: 0

परभणी मनपा: 1

औरंगाबाद मंडळ एकूण: 32

लातूर: 8

लातूर मनपा: 0

उस्मानाबाद: 3

बीड: 1

नांदेड: 0

नांदेड मनपा: 0

लातूर मंडळ एकूण: 12

अकोला: 7

अकोला मनपा: 7

अमरावती: 0

अमरावती मनपा: 5

यवतमाळ: 13

बुलढाणा: 21

वाशिम: 1

अकोला मंडळ एकूण: 54

नागपूर: 1

नागपूर मनपा: 55

वर्धा: 0

भंडारा: 0

गोंदिया: 1

चंद्रपूर: 0

चंद्रपूर मनपा: 3

गडचिरोली: 0

नागपूर मंडळ एकूण: 60

इतर राज्ये: 11

एकूण: 3202

संपादन- संदीप पारोळेकर

First published:

Tags: Corona, Coronavirus